Viral Video : बाळाला रांगायला शिकवतंय ‘हे’ कुत्र्याचं पिल्लू; पाहा, कुत्रा आणि बाळाचा खट्याळपणा
तुम्ही सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होणारे सर्व प्रकारचे खोडकर व्हिडिओ पाहिले असतील. आताही आम्ही एक असाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. व्हिडिओमध्ये लहान कुत्रा त्याच्यासोबत लहान मुलासारखा खेळताना दिसत आहे.
काही लोक थोडे खोडकर आणि तर काही गंभीर असतात. त्याचप्रमाणे प्राण्यांमध्येही काही खोडकर असतात. विशेषतः जर आपण कुत्र्यां(Dogs)बद्दल बोललो तर त्यांच्यापेक्षा खोडकर प्राणी नाही. ते बुद्धिमानही असतात. कुत्र्यांना जे काही शिकवले जाते ते ते पटकन शिकतात. याशिवाय ते निष्ठावानही असतात. त्यांच्यात निष्ठा इतकी रुजलेली असते, की ते आपल्या मालकासाठी प्राणही अर्पण करतात. आपण सध्या त्यांच्या खोडकरपणाबद्दल बोलत आहोत. तुम्ही सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होणारे सर्व प्रकारचे खोडकर व्हिडिओ पाहिले असतील. आताही आम्ही एक असाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. व्हिडिओमध्ये लहान कुत्रा त्याच्यासोबत लहान मुलासारखा खेळताना दिसत आहे.
कुत्रा आणि मुलाची मस्ती
व्हिडिओमध्ये एक लहान मूल जमिनीवर रांगत आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचवेळी लहान कुत्रादेखील त्याच्या शेजारी जमिनीवर पडलेला आहे आणि लहान मुलाप्रमाणंच पुढं जाण्याचं नाटक करतोय. यानंतर, व्हिडिओमध्ये असं दिसतं, की जेव्हा लहान मूल उठण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा लहान कुत्राही उठतो, परंतु थोड्याच वेळात तो पुन्हा जमिनीवर पडण्याच्या स्टाइलमध्ये येतं आणि मग मस्ती करत पुढं जातं.
ट्विटरवर शेअर
हा एक गंमतीदार व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Laughs_4_All नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शन लिहिलंय, की ‘तुम्हें रेंगना होगा…इस तरह’. अवघ्या 19 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तर 11 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे.
You gotta crawl…like this. ???? pic.twitter.com/qVIgdJ2wCt
— Laughs 4 All ? (@Laughs_4_All) January 14, 2022
मजेशीर कमेंट्स
व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की ‘बेशुमार मासूमियत’, तर दुसर्या यूझरनं ‘अमेझिंग डॉग… मुलाला कसं रांगायचं ते शिकवतंय’ अशी टिप्पणी केली. त्याचप्रमाणं आणखी एका यूझरनं लिहिलंय, की ‘असा गोंडस ट्रेनर कोणाला नको असेल?’.