ना टांगा पलटी, ना ‘गाढव’ फरार, कारच्या धडकेनंतर झालं ‘असं’ काही, पाहा थरारक VIDEO
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई : टांगा पलटी आणि घोडे फरार, अशी म्हण आपण ऐकली आहे. या म्हणीच्या अर्थाचा आणि आपल्या बातमीचा फार काही संबंध नाही. पण तरीही टांगा पलटी आणि घोडे फरार या म्हणीचा इथे उल्लेख करावा वाटतोय. कारण सोशल मीडियावर सध्या एका गाढव गाडीच्या अपघाताचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. आपण बैलगाडी, घोडा गाडी जशी पाहिली आहे तशी गाढव गाडी देखील पाहिलीच असेल. गाढवाला ज्योत किंवा लगाम लावून ज्या गाडीचा वाहतुकीसाठी उपयोग केला जातो ती गाडी म्हणजे गाढव गाडी असं म्हणायला हरकत नाही. अशाच एका गाढव गाडीच्या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका गाढव गाडीला कारची जोरदार धडक बसते. हा अपघात अतिशय भीषण असतो. कारण या अपघातात गाडीपुढे असणारा गाढव थेट हवेत जातो. पण नंतर तो पुन्हा जमिनीवर येतो. यावेळी तो स्वत:ला सावरत उभा राहण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान या गाढवाचा दोर हातात घेऊन बसलेला व्यक्तीदेखील गाडीत असतो. त्याने गाढवाचा दोर हातात घट्ट पकडलेला असतो. त्यामुळे तो वाचतो. त्यामुळे गाढवामुळेच त्याच्या मालकाचे प्राण वाचले, असं मानलं जात आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कुठे घडलीय याबाबतची अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या युजरआयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. गाढवाच्या सीटबेल्टने वाचवलं, नाहीतर कारने मारलंच असतं, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
गधे को सीट बेल्ट ने बचा लिया वर्ना कार वाले ने तो मार दिया था ? pic.twitter.com/xTyLv3VJfG
— Hasna Zaroori Hai (@HasnaZarooriHai) October 19, 2022
अवघ्या 17 सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत हजारो नागरिकांनी पाहिलं आहे. शेकडो नागरिकांनी या व्हिडीओला लाईक करत भन्नाट आणि वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. अनेकांनी ही घटना नेमकी कुठली आहे, गाढव आणि त्याच्या मालकाची प्रकृती कशी आहे? असे प्रश्न उपस्थित करत विचारपूस करण्याचा प्रयत्न केला आहे.