Video | गाढव-मुलीचं अतूट नातं, हंबरडा पाहून नेटकरी भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या मानव आणि प्राण्यांमधील अतूट नातं सांगणारा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. (donkey hugs little girl video)

Video | गाढव-मुलीचं अतूट नातं, हंबरडा पाहून नेटकरी भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
DONKEY AND GIRL VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 8:58 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज काहीतरी नवं घडत असतं. रोज नवनव्या गोष्टी समोर येत राहतात. यामध्ये काही व्हिडीओ दिवसभर चर्चेचा विषय ठरतात. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओंमध्ये काही व्हिडीओ मजेदार तर काही व्हिडीओ आपल्याला काहीतरी शिकवून जातात. सध्या मानव आणि प्राण्यांमधील अतूट नातं सांगणारा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. (Donkey hugs little Girl with love emotional video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

सोशल मीडियावर प्राणी तसेच पक्ष्यांचे व्हिडीओ विशेष चर्चेत असतात. या व्हिडीओंना पुन्हा पुन्हा पाहत राहावं असं वाटतं. सध्या असाच एका गाढवाचा आणि त्याला पाळणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पांढऱ्या रंगाचे गाढव एका मुलीकडे येताना दिसतेय. मुलीकडे येताना हे गाढव मोठ्या आवाजात ओरडत आहे. त्याचा आवाज ऐकून अनेक नेटकऱ्यांना तसेच प्राणीप्रेमींना भरुन आलंय. या गाढवाच्या आवाजामध्ये समोर उभ्या असलेल्या मुलीप्रती जिव्हाळा असल्याचे भासतेय. हे गाढव समोर येऊन मुलीच्या थेट गळ्यात पडलेले व्हिडीओमध्ये दिसतेय. मोठ्याने ओरडून गाढव समोर उभ्या असलेल्या मुलीसमोर लाड घालत आहे. हा व्हिडीओ पाहून गाढव आणि मुलीमधील जिव्हाळा स्पष्टपणे दिसतोय. लहानपणी या मुलीने गाढवाला वाढवले. तसे कॅप्शन व्हिडीओ अपलोड करताना देण्यात आले आहे. मुलीने काळजी घेतल्यामुळेच हे गाढव मुलीप्रती कृतज्ञ असल्याचे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याची खूप चर्चा होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 33 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहण्यात आलाय. गाढव हा ढिम्म प्राणी असल्याचा एक समज आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून गाढवाच्या संवेदनेची प्रचिती येत आहे. या गाढवाची चांगलीच चर्चा होत आहे. हा व्हिडीओ buitengebieden या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

VIDEO | कोरोना योद्ध्यांच्या स्मरणार्थ ITBP जवानाने वाजवलं ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ गाणं, व्हिडीओ व्हायरल

Video : 4 समोसे 20 रुपयांचे की 40? व्हायरल व्हिडीओत चिमुरड्याचा युक्तिवाद तुम्हीच पाहा

Facebook Twitter Ban | भारतात फेसबुक, ट्विटर बंद होणार? मग नवा पर्याय काय? पाहा नेटकरी काय म्हणतात?

(Donkey hugs little Girl with love emotional video goes viral on social media)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.