मुलांना मोबाइलवर खेळण्यात गुंतवून ‘मशीन’चा रंगला फुटबॉल खेळ, ड्रोनचा Video Viral

क काळ असा होता जेव्हा तंत्रज्ञान (Technology) आजच्यासारखं प्रगत नव्हतं. काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुतेकांनी ड्रोन(Drone)चं नावही ऐकलं नव्हतं. पण आजच्या काळात प्रत्येक मुलाला ड्रोनची माहिती झाली आहे. फुटबॉल (Football) खेळणारा ड्रोन आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुलांना मोबाइलवर खेळण्यात गुंतवून 'मशीन'चा रंगला फुटबॉल खेळ, ड्रोनचा Video Viral
फुटबॉल खेळणारे ड्रोन्स
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 2:43 PM

Drones playing football : एक काळ असा होता जेव्हा तंत्रज्ञान (Technology) आजच्यासारखं प्रगत नव्हतं. काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुतेकांनी ड्रोन(Drone)चं नावही ऐकलं नव्हतं. पण आजच्या काळात प्रत्येक मुलाला ड्रोनची माहिती झाली आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांनीही त्यांच्या क्षमतेनुसार ड्रोन बनवण्यास सुरुवात केली आहे. हे अनेक प्रकारे फायदेशीर देखील आहे. लष्करात ड्रोनचा समावेश करण्यात आला असून आता शेतीमध्येही ड्रोनच्या वापराला चालना देण्यात येत आहे. पण फुटबॉल (Football) खेळणारा ड्रोन तुम्ही क्वचितच पाहिला असेल? सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असले तरी आजकाल ड्रोन फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहून विचारही करायला लागाल.

ड्रोन फुटबॉल

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, की अनेक ड्रोन इमारतीवरून उडत आहेत आणि मजेत फुटबॉल खेळताना दिसत आहेत. यामध्ये दोन ड्रोन ‘स्टार प्लेयर्स’ मानले जाऊ शकतात, कारण फुटबॉल त्यांच्यापासून दुसरीकडे कोठेही जात नाही. तिथेच दोघे खेळत असतात. त्यांचा खेळ पाहून, ड्रोन आपोआप हवेत उडून फुटबॉल खेळत आहेत, असा विचार करत नाही का? वास्तविक, कोणीतरी हे ड्रोन चालवत असावे आणि त्यांना पाहून असे दिसते की तो फुटबॉलप्रेमी असावा.

ट्विटर हँडलवर शेअर

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अतिशय मजेशीर गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, की, मुले ‘मोबाइल’वर ‘व्यस्त’ झाल्यानंतर ‘मशीन’ बाहेर फुटबॉल खेळत आहे. 10 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 13 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

‘मशीन आमच्याशी खेळत आहे’

अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की हे देखील खरे आहे. आता आम्ही यंत्रांशी खेळत नाही तर मशीन आमच्याशी खेळत आहेत’, तर आणखी एका यूझरने अशीच काहीशी कमेंट केली आहे. त्याने लिहिले, ‘अजून बरेच नाटक बाकी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता शिखरावर पोहोचलेली नाही, येत्या पन्नास वर्षात मानव रोबोटचा गुलाम बनून राहणार आहे. त्याच वेळी, मानवी मेंदूमध्ये अजूनही एक चिप बसवणे शिल्लक आहे.

मास्क घालूनही चिमुकल्यानं खाल्लं लॉलीपॉप, ‘असा’ अफलातून जुगाड पाहिला नसेल! Video Viral

कितने तेजस्वी लोग हैं! Escalatorवर उलटं पळणारे हे तरूण पाहा, प्रवाहाविरूद्ध चालणं यालाच म्हणतात!

Video : Union Budgetनंतर युवकानं सायकलचं हे असं काय केलं? हर्ष गोयंकांचं मजेशीर ट्विट होतंय Viral

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.