Dubai Sheikh Hummer : कार नाही, चालता-फिरता राजमहल! दुबई शेखची पाहा श्रीमंती
Dubai Sheikh Hummer : दुबईतील एका शेखच्या कारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आलिशान कार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. साधारण कार पेक्षा ती तीन पट मोठी आहे.
नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : दुबईतील शेखची (Dubai Sheikh) प्रत्येक गोष्ट सर्वसामान्यापेक्षा अधिक निराळी असते. सध्या सोशल मीडियावर या कारची चर्चा रंगली आहे. हॅमर एच1 ची लांबी 184.5 इंच, उंची 77 इंच आणि रुंदी 86.5 इंच असते. पण दुबईतील एका अब्जाधीश शेखची हॅमर (Giant Hammer) यापेक्षा तिप्पट आहे. शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांच्याकडे हा चालता-बोलता राजवाडा आहे. त्यांच्याकडे विशाल कारचे कलेक्शन आहे. त्यांच्या ताफ्यात असंख्य कार आहेत. त्यावरुनच त्यांची ओळख आहे. ते कारचे शौकीन आहे. ही हॅमर जगभरातील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या कारसमोर एखादा माणूस तर अगदीच छोटा दिसतो.
रेनबो शेख ऑफ दुबई
शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांची ‘रेनबो शेख ऑफ दुबई’ अशी पण ओळख आहे. त्यांच्या ताफ्यात असंख्य कार आहेत. अमिरातमधील या शेखकडे सर्वात मोठ्या एसयुव्ही आहे. तिची गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद आहे.
इतक्या कार ताफ्यात
या शेखकडील हॅमर कार साधारण मॉडलपेक्षा तीन पट्ट मोठी आहे. त्यांच्याकडे एकूण 3000 कारचे कलेक्शन आहे. या शेखकडे इंद्रधनुष्यातील सर्व रंगाच्या कार आहेत. मर्सिडीज एस पासून तर जगभरातील सर्व कार त्यांच्या ताफ्यात आहेत. सर्वात मोठ्या एसयुव्ही पण आहेत. त्यांची संख्या 718 च्या घरात आहेत.
व्हिडिओ जुना, शेअर पुन्हा पुन्हा
दुबई शेखच्या विशालकाय हॅमरचा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा ट्विटरवर शेअर होत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी वारंवार शेअर होत आहे. ही भीमकाय कार इतर वाहनांवर भारी पडत आहे.
महाकाय हॅमर किती मोठी
ही महाकाय हॅमर अत्यंत मोठी आहे. ही जायंट हॅमर एच1 एक्स3 जवळपास 46 फूट लांब, 21.6 फूट उंच आणि 19 फूट रुंद आहे. या कारला खास करुन शेख कुटुंबासाठी तयार करण्यात आले आहे.
Dubai Rainbow Sheikh’s giant Hummer H1 “X3” is three times bigger than a regular Hummer H1 SUV (14 meters long, 6 meters wide, and 5.8 meters high). The Hummer is also fully drivable
[read more: https://t.co/LlohQguhTM]pic.twitter.com/uV1Z4juHKx
— Massimo (@Rainmaker1973) July 27, 2023
इतक्या संपत्तीचा धनी
शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांच्याकडे 20 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ते अमिरातीतील शाही कुटुंबाचे सदस्य आहेत. ट्विटरमध्ये या महाकाय कारसमोर इतर कार आणि माणसं अगदी छोटी दिसत आहेत.
कार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का
ही कार पाहून सोशल मीडियावरील अनेक युझर्सला धक्का बसला आहे. ही कार एकदम अचंबित करणारी आहे. तिला चालविण्याचा मोह आवरता आवरत नसल्याचा दावा एका युझरने केला आहे. तर दुसऱ्याने या कारची स्वच्छता आणि मेंटन्सससाठी अधिक खर्च येत असल्याचा दावा केला. अनेक युझर्सने सोशल मीडियावर त्यावर प्रतिक्रिया दिल्या.
कारमध्ये सर्वसुविधा
ही हॅमर कार मॉडिफाय करण्यात आली आहे. या कारचा समोरचा भाग साधारण आहे. या कारचा इंटिरिअर एखाद्या छोट्या घरासारखा दिसतो. या कारमध्ये एक लिव्हिंग रुम, एक टॉयलेट, या कारचे स्टेअरिंग कॅबिन दुसऱ्या मजल्यावर आहे. शेख हमद यांचे खासगी कार कलेक्शनमध्ये एकूण 3000 कार आहेत. त्यांना ‘रेनबो शेख’ असा किताब आहे.