Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाजराचा हलवा, संकेत म्हात्रेच्या आवाजाचा हिंदी डबिंगमध्ये जलवा! अल्लू अर्जूनसह कुणाकुणासाठी डबिंग?

Sanket Mhatre : दक्षिणेतले हे सिनेमे तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून, युट्युब चॅनेलवर, किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले असतील. हिंदी भाषेतून जर तुम्ही हे सिनेमे पाहिले असतील, तर तुम्ही संकेत म्हात्रे यांचा आवाज ऐकला नसेल, असं होणं जवळपास अशक्य आहे.

गाजराचा हलवा, संकेत म्हात्रेच्या आवाजाचा हिंदी डबिंगमध्ये जलवा! अल्लू अर्जूनसह कुणाकुणासाठी डबिंग?
संकेत म्हात्रे, डबिंग आर्टिस्ट
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 7:02 PM

नुकताच अल्लू अर्जून आणि रश्मिका मंधानाचा पुष्पा द राईज (Pusha The Rise) हा सिनेमा ओटीटीवरही हिंदीतून प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनलाही तुफान प्रतिसाद मिळतोय. दक्षिणेतले अनेक सिनेमे हिंदीतून बघण्याचा चस्का लागलेल्या चाहत्यांसाठी आत एक इंटरेस्टिंग माहिती घेऊन आलो आहोत. बॉलिवूडपेक्षाही सध्या महाराष्ट्रात दक्षिणेकडच्या सिनेमांची क्रेझ वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दक्षिणेकचडी गाणी, तिथले स्टार आणि इतर सगळं प्रेक्षकांना भावतंय. भुरळ पाडतंय. आवडतंय. अशातच दक्षिणेतले हे सिनेमे तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून, युट्युब चॅनेलवर, किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले असतील. हिंदी भाषेतून जर तुम्ही हे सिनेमे पाहिले असतील, तर तुम्ही संकेत म्हात्रे यांचा आवाज ऐकला नसेल, असं होणं जवळपास अशक्य आहे. अल्लू अर्जूनही दक्षिणेतल्या अनेक बड्या अभिनेत्यांसाठी संकेत म्हात्रे हे मराठमोळं नाव डबिंग करताना पाहायला मिळालं आहे. टॅलेंट तडका या युट्युब चॅनेलवर संकेत म्हात्रे यांच्या डबिंगचे डेमोही पाहायला मिळाले आहेत. फक्त दक्षिणेतलेच नाही, तर अनेक हॉलिवूड सिनेमांसह वेगवेगळ्या कार्टून कॅरेक्टरलाही संकेत म्हात्रेनं (Sanket Mhatre) आपला आवाज दिलाय.

सुपरस्टार संकेत..

संकेत म्हात्रे भारतातील प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट आहेत.बेनटेन या प्रसिद्ध कार्टूनचा नायक आणि त्याच्या आवाज हा संकेत यांनी दिला आहे. इंग्रजी आणि दक्षिणेतले अनेक सिनेमे संकेतनं हिंदीतून डब केले आहेत. तर हिंदी जब टीव्ही मालिका, वेबसीरीज साठीही त्यानं आपला आवाज दिलाय.

डंबिगच्या क्षेत्रात अपघातानंच

आपण अपघातानंच डबिंग या क्षेत्रात आलं असल्याचं संकेत म्हात्रे यानं म्हटलंय. एक रेकॉर्डिंग स्टुडिओ चालवताना डबिंग आर्टीस्ट आला नाही, म्हणून तेव्हा संकेत म्हात्रेनं आपला आवाज दिला. काही आवाज काढले. क्लाईंटलाही ते आवाज आवडले. आणि त्यानंतर संकेतला डबिंगसाठी सातत्यानं विचारणा होऊ लागली. आतापर्यंत 20 सुपरहिरोंसाठी संकेत म्हात्रे यांनी डबिंग केलं आहे. डेडपूल, अल्लू अर्जून पिकाचू यांच्यासह अनेक दिग्गजांना आवाज देणारा हा मराठमोळा चेहरा आज डबिंग इंडस्ट्रीमधलं एक आघाडीचं नाव बनलाय.

पाहा संकेत म्हात्रे यांच्या डबिंगचा डेमो –

संबंधित बातम्या :

PHOTO | KGF मधील ‘रॉकी’च्या दमदार हिंदी संवादामागे लपलाय ‘या’ मराठमोळ्या कलाकाराचा आवाज!

पाहा ताज्या बातम्या :

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.