Eagle Attack Fox : Video पाहून यूझर्स म्हणतायत, पुतीन यांच्याबाबतीतही असंच होणार!

Wild animals video : गरुडाचा (Eagle) एक धक्कादायक (Shocking) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गरुड एका भयानक कोल्ह्याची शिकार करताना दिसत आहे.

Eagle Attack Fox : Video पाहून यूझर्स म्हणतायत, पुतीन यांच्याबाबतीतही असंच होणार!
गरुड/प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 12:51 PM

Wild animals video : गरुड हा आकाशातील सर्वात धोकादायक शिकारी आहे. त्याचे पातळ आणि दुमडलेले पंख त्याला वेगाने उडण्यास आणि त्याच वेगाने दिशा बदलण्यास मदत करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की गरुड ताशी 320 किमीपेक्षा जास्त वेगाने उडू शकतो. गरुड हा आकाशातील सर्वात वेगवान पक्षीच नाही तर पृथ्वीवर सर्वात वेगाने धावणारा पक्षी आहे. आकाशाच्या उंचीवरूनही तो जमिनीवर आपली शिकार सहज पाहू शकतो. गरुडाचा (Eagle) एक धक्कादायक (Shocking) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गरुड एका भयानक कोल्ह्याची शिकार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. गरुड कोल्ह्याला आपल्या धारदार पंजांमध्ये पकडतो आणि क्षणार्धात त्याचा फडशा पाडतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोल्ह्याची धोकादायक पद्धतीने शिकार करताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

कोल्हा पळायला लागतो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक गरुड डोंगरावर उडत आहे. इतक्यात त्याची नजर कोल्ह्यावर पडते. यानंतर पंख पसरवत, तो पूर्ण वेगाने आकाशाच्या उंचीवरून खाली येतो आणि कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. कोल्ह्याला आपला शिकार बनवण्यासाठी गरुड त्याच्यावर हल्ला करतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अचानक झालेल्या हल्ल्याच्या भीतीने कोल्हा तिथून पळू लागतो. पण गरुड कोल्ह्याचा पाठलाग करून मजबूत पंजानं त्याचावर झडप घालतो.

ट्विटर अकाऊंटवरून शेअर

Life and nature या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अंदाज बांधता येतो, की गरुड किती धोकादायक पद्धतीने आपली शिकार पकडतो. व्हिडिओ खूप वेगाने पाहिला आणि शेअर केला जात आहे. यावर कमेंट्सही केल्या जात आहेत. एकानं लिहिले आहे, की वाज एक ऐसा पक्षी है जो अपने शिकार को किसी भी कीमत में छोड़ना नहीं चाहता. तर आणखी एकाने लिहिले, की That’s what will happen to Putin.

आणखी वाचा :

#Himveers : ITBPच्या ज्युलीचा आपल्या गोंडस पिल्लांसोबतचा ‘हा’ Photo आणि Video होतोय Viral! तुम्ही पाहिला का?

दोन चिमुरड्यांना भीषण आगीतून वाचवण्याचा थरार; पाहा, अंगावर काटा आणणारा ‘हा’ Viral video

रशियन सैनिकांचा Flirt game, युक्रेनच्या महिलांना Tinderवर पाठवतायत Messages आणि Photos!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.