40 वर्षीय इसमाच्या पोटातून निघाले इअरफोन, स्क्रु, बोल्ट आणि बरेच काही

पोटात दुखतंय म्हणून एका चाळीस वर्षीय इसमाला दवाखान्यात दाखल केले तर डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे काढला तर त्यांना धक्काच बसला त्याच्या पोटातून घरातील इअरफोनपासून अनेक फुटकळ वस्तू निघाल्या

40 वर्षीय इसमाच्या पोटातून निघाले इअरफोन, स्क्रु, बोल्ट आणि बरेच काही
moga hospital Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 4:32 PM

पंजाब | 28 सप्टेंबर 2023 : भूक लागल्यानंतर आपण अन्नपदार्थ खात असतो. परंतू एका चाळीस वर्षांच्या इसमाने आपल्या पोटाला भंगाराचे गोदाम समजून वाटेल ती वस्तू खाल्ली. अखेर पोटात दुखत आहे म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा त्याचे ऑपरेशन करण्यात आले ते डॉक्टरांनाच धक्का बसला. त्याच्या पोटातून स्क्रु, बोल्ट, इअरफोन, लॉकेट अशा एकापेक्षा एक धोकादायक वस्तू निघाल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. या इसमाच्या ऑपरेशनला तीन तास लागले.या इसमाच्या जीवाचा धोका अद्याप टळलेला नसून त्याला व्हेंटीलेटरवर ठेवले आहे.

कुलदीप सिंग याला येथील मोगा मेडीसिटी स्पेशिलीटी रुग्णालयात आणले तेव्हा त्याला हाय फिव्हर, उलट्या आणि पोटात दुखत होते. डॉक्टरांनी सांगितले की त्याला दोन ते तीन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास सुरुच होता. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे काढला तेव्हा त्याच्या पोटात लॉकेट, चेन, नट, बोल्ट, इअरफोन आणि अनेक सटरफटर वस्तू आढळल्या. त्यानंतर कुलदीप याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतल्याचे रुग्णालयाचे संचालक अजमेर सिंग कार्ला यांनी सांगितले.

एक प्रकारचा आजार

सर्जन अनुप हांडा आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ.विश्वनूर कार्ला यांनी कुलदीप याच्यावर ऑपरेशन केले. या रुग्णाला पीका डीसओर्डर हा आजार आहे. पीका डीसऑर्डर हा खाण्यासंबंधीचा आजार आहे ही व्यक्ती अन्नपदार्थांऐवजी भलत्याच वस्तू गिळत असते. रुग्णाने अनेक धारदार वस्तू खाल्ल्याने त्याच्या आतड्याला अनेक जखमा झाल्या होत्या. कुलदीप याची ऑपरेशन जरी यशस्वी झाले असले तरी त्याची तब्येत अजूनही क्रीटीकल आहे. त्याला व्हेंटीलेटरवर ठेवले असल्याचे अजमेकर सिंग यांनी सांगितले.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.