आठ किलोचा बाहुबली समोसा पाहिला का? समोसा पाहून हर्ष गोयंकांच्या पत्नीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा समोशाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी हातात समोसा घेऊन दिसत आहे. ही मुलगी फूड ब्लॉगर आहे.
समोसा म्हटले की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. वडापाव आणि समोसा खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. त्यामुळे कुठल्याही टपरीवर जरी समोसा दिसला तरी तो खाण्याचा आनंद अनेकजण लुटतात. असा क्वचितच कुणी असेल ज्याला समोसा आवडत नसेल. लहान मुलं असो किंवा तरुण, वृद्ध सर्वजण समोसा खाण्याला पसंत करतात. सध्या सोशल मीडियामध्ये उद्योजक हर्ष गोयंकाच्या बाहुबली समोसा प्रचंड चर्चेत आहे
तुम्ही विविध प्रकारचे समोसे खाल्ले असतील. बटाटा-मटर समोसा, पनीर समोसा, चाऊमीन समोसा, पास्ता समोसा, टॉकलेट समोसा असे विविध प्रकारचे समोसे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या समोशाची.
हर्ष गोयंका यांनी शेअर केला व्हिडिओ
प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा समोशाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी हातात समोसा घेऊन दिसत आहे. ही मुलगी फूड ब्लॉगर आहे.
After all the Diwali sweets, my wife has ordered me to eat not more than one samosa today…… pic.twitter.com/WjuRObFD0T
— Harsh Goenka (@hvgoenka) October 26, 2022
व्हिडिओ शेअर करत गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘या दिवाळीत माझ्या पत्नीने माझ्या जेवणासाठी सर्व मिठाईनंतर फक्त एक समोसा ऑर्डर केला आहे. तिची इच्छा आहे, मी फक्त एकच समोसा खावा.’
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा समोसा केवढा आहे तो. या समोशाचे वजन आठ किलो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
केवळ 30 मिनिटात खायचा असतो हा समोसा
व्हिडिओमधील हा समोसा उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका दुकानात मिळतो. हा समोसा फक्त 30 मिनिटांत खायचा असतो. 30 मिनिटात हा समोसा खाल्ल्यास तुम्हाला 51 हजार रुपयांचे बक्षीसही मिळेल. या समोशाचे नाव ‘बाहुबली’ समोसा आहे.
मेरठमध्ये शुभम नावाचा व्यक्ती हे दुकान चालवतो. या समोशामध्ये बटाटा आणि पनीर भरलेले असते. अतिशय चविष्ट अशा या समोशाची किंमत 1100 रुपये आहे.