Elephant viral video : ‘या’ हत्तीला आहे भलतीच ‘खाज’, झाडावर असा काही केला ‘प्रहार’ की…
Animal Shocking Video : हत्तींमध्ये (Elephants) अफाट शक्ती असतो. कदाचित यामुळेच जंगलाचा राजा सिंहही (Lion) त्याच्याशी पंगा घेण्यापूर्वी विचार करतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळाला ज्याl हत्तीचा राग आणि ताकद पाहायला मिळत आहे.
Animal Shocking Video : हत्तींमध्ये (Elephants) अफाट शक्ती असतो. कदाचित यामुळेच जंगलाचा राजा सिंहही (Lion) त्याच्याशी पंगा घेण्यापूर्वी दहा वेळा विचार करतो. जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो सगळीकडे विद्ध्वंस करतो. इतकंच नाही तर काही वेळा ते रागाच्या भरात माणसांवर हल्ला करून त्यांना धोका उत्पन्न करू शकतो. जर तुम्हाला हत्तीचा राग आणि त्याची शक्ती (Elephant Viral Video) माहीत नसेल तर ती जाणून घेता येवू शकतो. कारण आज असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळाला. ज्यामध्ये हत्तीचा राग आणि ताकद दोन्ही पाहायला मिळत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की जंगलात फिरणारा हत्ती एका हिरव्या झाडाजवळ पोहोचतो आणि झाडाला सोंडेने खाली ओढण्याचा प्रयत्न करू लागतो. हत्ती आपल्या सोंडेने झाडाला ढकलत आहे.
गजराजाचा प्रहार
गजराजाच्या प्रहारामुळे काही सेकंदात झाड कोसळते. झाड जमिनीवर पडताच हत्ती झाडाजवळ पोहोचतो आणि त्यावर बसतो आणि त्याचे शरीर खाजवू लागतो. असे दिसते की हत्तीच्या अंगाला खाज सुटली होती त्यामुळेच त्याला राग येत होता आणि म्हणूनच त्याने झाड जमिनीवर टाकले. @Gannuuprem नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 1 लाख 74 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून लोक कमेंट्सद्वारे या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
‘सिंहसुद्धा याची छेड काढण्याआधी शंभर वेळा विचार करतो’
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरने लिहिले, की, ‘गन्नू जीची समस्या कोणालाच समजत नाही.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की हे सुद्धा Deforestionसाठी जबाबदार आहे.’ दुसऱ्या यूझरने लिहिले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला समजले की जंगलाचा राजा सिंहसुद्धा याची छेड काढण्याआधी शंभर वेळा विचार का करतो.” याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Why do people edit such videos? Though it is justified as per Gannu Law Book. pic.twitter.com/NoekvegFpa
— Gannuprem (@Gannuuprem) February 14, 2022