इंटरनेट बद्दलची सगळ्यात मोठी भविष्यवाणी खरी ठरलीये का? Elon Musk यांची 25 वर्षांपूर्वीची मुलाखत व्हायरल
हा व्हिडिओ ट्विटरवरच समोर आला आहे. गंमत म्हणजे Elon Musk नी स्वत: या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ टेस्ला ओनर्स सिलिकॉन व्हॅली नावाच्या युजरच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.
ट्विटरचे मालक आणि इंटरनेट विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेले व्यक्तिमत्त्व एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एलन मस्क गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असले तरी नुकतीच त्यांची एक अतिशय जुनी मुलाखत व्हायरल झालीये. या व्हिडीओमध्ये ते इंटरनेटविषयी बोलत आहेत. या मुलाखतीची आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी एक भविष्यवाणी केली होती जी 25 वर्षांनंतर खरी ठरते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे आहे. हा व्हिडिओ ट्विटरवरच समोर आला आहे. गंमत म्हणजे त्यांनी स्वत: या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ टेस्ला ओनर्स सिलिकॉन व्हॅली नावाच्या युजरच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.
प्रिंट, ब्रॉडकास्टिंग, रेडिओ, प्रामुख्याने सर्व प्रसारमाध्यमे इंटरनेटवर फोल्ड होताना दिसतील म्हणजेच ही सगळी माध्यमं इंटरनेटमध्ये समाविष्ट होताना दिसतील असे त्यांचे म्हणणे आहे. इंटरनेट ही अशी गोष्ट आहे जे पहिलं बुद्धिमान असणारं माध्यम आहे. या माध्यमावर दुतर्फा संभाषण करता येतं. यामुळे ग्राहकांना आपल्याला काय पहायचे आहे ते निवडता येते.
मला वाटते की यामुळे सर्व पारंपारिक माध्यमांमध्ये क्रांती होणार आहे. खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून एलन मस्क इंटरनेटच्या गुणवत्तेबद्दल बोलत होते. इंटरनेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येत्या काळात इंटरनेट हा पारंपरिक माध्यमांचा एक मोठा पर्याय म्हणून उदयास येईल, असे त्यांनी नमूद केले. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे इंटरनेट हे दुतर्फा संवादाचे सर्वात मोठे माध्यम ठरेल.
25 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये त्यांनी दिलेल्या या मुलाखतीतले हे दोन्ही अंदाज खरे ठरलेत. या दोन गोष्टींकडे पाहिलं तर हे दोन्ही अंदाज आजच्या युगात खरे ठरले आहेत. आज त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून एक मोठा पर्याय लोकांसमोर ठेवला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेटने जगात अशी क्रांती घडवून आणली आहे, ज्याची काही दशकांपूर्वी कल्पनाही केली गेली नव्हती.
.@elonmusk explains the internet back in the day. pic.twitter.com/h6wxGkzrSG
— Tesla Owners Silicon Valley (@teslaownersSV) February 17, 2023
एकूणच एलन मस्क यांचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. जगभरातील लोक या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत आणि एलन मस्कचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, एलन मस्क खरोखरच दूरदर्शी होते.
खुद्द एलन मस्क यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत हा व्हिडिओ कधीचा आहे, अशी विचारणा केली. यानंतर उत्तर आलं की, हा व्हिडिओ 1998 चा आहे.