सुपरफास्ट कर्मचारी! अरे भाई माणूस आहे की मशीन? व्हिडीओ बघून लोकांनाच धक्का बसला
15 सेकंदात 3 प्रवाशांना तिकीट लोक अवाक!
तुम्ही कधी लोकल ट्रेनमधून प्रवास केला असेल तिकीट तर काढण्यासाठी ट्रेनमध्ये चढण्यासाठी लांब रांगेत उभं राहण्याची धडपड तुम्हाला चांगलीच ठाऊक असेल. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या तिकीट काऊंटरवर अशा ‘सुपरफास्ट’ कर्मचाऱ्याची गरज आहे. का? व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याचे उत्तर मिळेल.
हा व्हिडिओ ट्विटर हँडल @mumbairailusers 29 जून रोजी शेअर केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- “भारतीय रेल्वेमध्ये कुठेतरी…” या माणसाची गती आश्चर्यकारक आहे.
हा माणूस १५ सेकंदात ३ प्रवाशांना तिकीट देत आहे. या व्हिडिओला बातमी लिहिताना 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आणि साडेसात हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
ही क्लिप १८ सेकंदांची असून, त्यात एक वयस्कर व्यक्ती (रेल्वे कर्मचारी) तिकीट व्हेंडिंग मशीनमधून प्रवाशांना तिकीट काढून देतोय. त्याचा वेग इतका वेगवान आहे की, तो १५ सेकंदातच तीन प्रवाशांचे तिकीट काढून देतोय.
Somewhere in Indian Railways this guy is so fast giving tickets to 3 passengers in 15 seconds. pic.twitter.com/1ZGnirXA9d
— Mumbai Railway Users (@mumbairailusers) June 28, 2022
जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा लोक आश्चर्यकारक कौशल्य पाहून अवाक झाले. काही युजर्सचं म्हणणं आहे की, या व्हिडीओमध्ये त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव दिसून येतो.