तालिबानने खरंच हेलिकॉप्टरला मृतदेह लटकवला? व्हायरल व्हिडीओमागील सर्वात मोठं सत्य समोर

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती भयावह आहे. सगळीकडे आक्रोश पाहायला मिळतोय. लोकांना आपला देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडले जात आहे.

तालिबानने खरंच हेलिकॉप्टरला मृतदेह लटकवला? व्हायरल व्हिडीओमागील सर्वात मोठं सत्य समोर
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 5:19 PM

काबूल : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती भयावह आहे. सगळीकडे आक्रोश पाहायला मिळतोय. लोकांना आपला देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडले जात आहे. सोशल मीडियावर तालिबानच्या क्रूरतेचे पुरावेही समोर येत आहेत. अलीकडेच, तालिबानच्या क्रूरतेचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक माणूस हेलिकॉप्टरला लटकलेला आणि बराच वेळ हवेत उडताना दिसत होता. हा व्हिडिओ समोर आल्यापासून जगभरात तालिबान्यांचा निषेध सुरु आहे. परंतु आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे. (Fact Check : Viral Video Shows Taliban Fighter Attached to Helicopter Trying to Put a Flag, Not a dead Body Hanging)

नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तालिबानी (Taliban) अमेरिकन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर उडवताना दिसतात. या हेलिकॉप्टरला दोरीच्या मदतीने एक मृतदेहही लटकवण्यात आला होता. हा व्हिडिओ कंधारचा असल्याचे समजले. असे सांगण्यात येत होते की, ज्या व्यक्तीचा मृतदेह लटकवण्यात आला होता ती व्यक्ती अमेरिकेला मदत करत होती. हा व्हिडिओ जमिनीवरुन चित्रित करण्यात आला असल्याने त्या हेलिकॉप्टरला लटकवण्यात आलेली व्यक्ती जिवंत आहे की नाही हे स्पष्ट झाले नव्हत. पण, ज्या व्यक्तीचा मृतदेह तालिबान्यांनी बांधला होता त्याची आधीच हत्या झाली होती, असा दावा देखील एका अहवालात करण्यात आला होता.

दरम्यान, जगभरातील माध्यमांमध्ये या दाव्याच्या अगदी उलट माहिती बीबीसी आणि अफगाणिस्तानच्या काही स्थानिक पत्रकारांनी मांडली आहे. या व्हायरल व्हिडिओचे एक वेगळे सत्य त्यांनी सादर केलं आहे. जेव्हा या व्हिडिओचे सत्य समोर आले, तेव्हा सोशल मीडियावर या व्हिडिओबद्दल केले जाणारे दावे वेगळे असल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. वास्तविक, अहवालांनुसार, हेलिकॉप्टरला लटकलेली व्यक्ती तालिबानी आहे. हेलिकॉप्टरला लटकलेला माणूस सुमारे 100 मीटर उंच ध्वज लावण्याचे काम करत होता. म्हणजेच त्याला कोणतीही शिक्षा दिली जात नव्हती. हेलिकॉप्टरला लोंबकळत असलेला माणूस तालिबानी आहे, जो झेंडा फडकवण्यासाठी लोंबकळत होता. हे काम हेलिकॉप्टरच्या मदतीने केले जात होते, जेणेकरून ध्वज इतक्या उंचीवर सहजपणे फडकवता येईल. मात्र, त्या व्यक्तीने केलेल्या प्रयत्नात तो यशस्वी होऊ शकला नाही.

पुढच्या व्हिडीओ आणि चित्रांमध्ये असे दिसून आले आहे की, कंधार शहरावर उडणाऱ्या या हेलिकॉप्टरला लटकलेला माणूस जिवंत आहे. त्याने ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरच्या पायलटची विंच घातली आहे आणि तो तालिबानचा झेंडा फडकवत आहे. हेलिकॉप्टरला लटकलेला तालिबानी माणूस सार्वजनिक इमारतीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा हा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स अनेक प्रश्न विचारत आहेत. लोक केवळ हा व्हिडिओ शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील देत आहेत.

इतर बातम्या

अफगाणमधील पंजशीरमध्ये 350 तालिबान्यांचा खात्मा, 40 जण पकडले, स्थानिक नागरिकांच्या सैन्याचा दावा

ISIS मध्ये सामिल 25 भारतीय अफगाणिस्तानात, भारतात पाठवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता?

Video : अमेरिकेला मदत करणाऱ्याला हेलिकॉप्टरला टांगून हत्या, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

(Fact Check : Viral Video Shows Taliban Fighter Attached to Helicopter Trying to Put a Flag, Not a dead Body Hanging)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.