बाबा Busy आहेत, जा खेळायला; असं म्हणणाऱ्या वडिलांना काय उत्तर देतो ‘हा’ चिमुरडा? Emotional video viral

Father son video : लहान मुलं ही खोडकर असतात. त्यांना सतत सोबत कोणीतरी पाहिजे असतं. मात्र अशावेळी त्यांना एकटेपणा (Loneliness) सतावत असेल तर पालकांनीही (Patents) जागरूक (Alert) व्हायला हवे. असाच काहीसा संदेश एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला जातोय.

बाबा Busy आहेत, जा खेळायला; असं म्हणणाऱ्या वडिलांना काय उत्तर देतो 'हा' चिमुरडा? Emotional video viral
वडील-मुलगा यांच्यातला भावनिक संवाद
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 10:09 AM

Father son video : सध्याचं जग हे फास्ट आहे. सर्व गोष्टी या घड्याळाच्या काट्यावर चालतात, असं आपण नेहमी ऐकत असतो. प्रत्येकजण पैशाच्या मागं लागला आहे. त्यामुळे त्याला घर, परिवार, नातीगोती या कशाचंच भान राहिलेलं दिसत नाही. नात्यांचा विसर माणसाला पडत चालला आहे. घरामध्ये आई-वडील आणि मुले यांचा संवाद यामुळे कमी झाला आहे. मुलांमध्ये एकलकोंडेपणा त्यामुळे वाढत चालल्याचंही आपण नेहमीच वाचतो. तर संध्याकाळचं जेवण किती कुटुंबात एकत्र होतं, हाही प्रश्न आहेच. लहान मुलं ही खोडकर, खेळकर आणि मस्ती करणारी असतात. त्यांना सतत सोबत कोणीतरी पाहिजे असतं. मात्र अशावेळी त्यांना एकटेपणा (Loneliness) सतावत असेल तर पालकांनीही (Patents) जागरूक (Alert) व्हायला हवे. असाच काहीसा संदेश एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला जातोय. वडील मुलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

‘एका तासात किती रुपये कमावता?’

व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती दिसतोय. तो फोनवर कुणाशीतरी बोलत आहे. तर त्या व्यक्तीचा मुलगाही आपल्याला व्हिडिओत दिसतोय. मुलगा वडिलांना विचारतो, की तुम्ही एका तासात किती रुपये कमावता? त्यावर वडील म्हणतात, काय करणार माहीत करून, जा खेळायला, आता मी बिझी आहे. मग मुलगा चेहरा पाडत तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशीही व्यस्त असलेल्या आपल्या वडिलांना मुलगा तोच प्रश्न विचारतो. मग वडिल तेच उत्तर देतात. यावेळी मुलाच्या डोळ्यांतून पाणी येतं. वडिलांच्या रागावण्यानंतर मुलगा काय करतो, हे या व्हिडिओत पाहुन तुमच्या लक्षात येईल, नात्यांचं महत्त्व.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ ईशान अली 11 (Ishaan Ali 11) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. 17 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून त्यात वाढच होत आहे. ‘Paisa har jgah kaam nhin ata’ असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. ते याला लाइक करत असून अनेकजण कमेंटद्वारे कौतुकही करत आहेत. (Video courtesy – Ishaan Ali 11)

आणखी वाचा :

…अन् असा ‘धप्पा’ दिला, की आईही घाबरली; वाघाचा ‘हा’ Cute video झालाय Viral

जोडी थोडी Odd आहे, पण लय लय ग्वॉड आहे..; Viral होतंय हे Naadkhula Marathi Song, एकदा पाहाच

Online Classesचा ‘असा’ही परिणाम, चिमुरड्याचा ‘हा’ Viral Video पाहा, हसू आवरणार नाही

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.