अन् लखोबाचं भांड फुटलं; बोगस ठाणेदाराची पाचही बोटं तुपात, पण एका पत्नीने असा केला ‘खेला’
Five Marriage, Wife Exposed Husband : इथं अनेक तरुणांची लग्न जुळेना आणि इकडं या पठ्ठ्याने एक, दोन नव्हे तर पाच लग्नं केली. आपण पोलीस अधिकारी असल्याची थाप मारून त्याने हे कांड केले. एका पत्नीनेच त्याचा भांडाफोड केला.

इथं अनेक तरुणांची लग्न होत नसल्याने मोर्चे निघत आहे. पण या पठ्ठ्याने थाप्पांच्या जोरावर पाच जोरू करून आणल्या. पाच लग्न केली. पोलीस विभागात मोठ्या हुद्दावर असल्याची थाप मारून त्याने तरुणींशी सूत जळवले आणि नंतर लग्नही केली. पण एका पत्नीला त्याची ही हुशारी लवकर कळाली. तिने थेट पोलीस ठाणे गाठले. याची कुणकुण लागताच हा बोगस पोलीस अधिकारी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशातील नवाबगंज क्षेत्रात ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
स्टाईल अशी की जणू पोलीस अधिकारी
या आरोपीने प्रत्येक लग्नावेळी आपण पोलीस अधिकारी असल्याचा असा बनाव केला की कुणाचा पण विश्वास बसावा. त्यासाठी त्याने वर्दीपासून ते पोलीस वाहनापर्यंत सर्व काही मॅनेज केले. पाचव्या मुलीशी लग्न केले. त्यावेळी त्याचे सर्व कांड समोर आले. विशेष म्हणजे त्याच्या चारही पत्नीने त्याच्याविरोधात कोर्टात दावा केलेला आहे. पण याची माहिती चौघींना सुद्धा नव्हती.




पाचव्या पत्नीने केला भांडफोड
पाचव्या पत्नीने या लखोबाचा भांडाफोड केला. त्याने लग्नासाठी रीतसर हात मागितला. लग्न लावल्यानंतर पत्नीला घरी घेऊन आला. त्यानंतर आजूबाजूची चर्चा तिच्या कानावर आली. आपल्या नवऱ्याची अगोदरच चार लग्न झाल्याची खातरजमा झाल्यावर तिने सासरी मोठा हंगामा केला. पण सासरकडील मंडळींनी तिला मारहाण केली. तिने सर्व माहिती मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाचव्या पत्नीला घराबाहेर काढले.
पीडितेने गाठले पोलीस स्टेशन
पतीचे कारनामे तिने माहिती करून घेतले. पहिली पत्नी गाजियाबाद, दुसरी क्योलडिय, तिसरी आणि चौथी पत्नी तर बीसलपूर या एकाच गावातील असल्याची माहिती पीडितेने काढली. या चारही पत्नींना त्याची माहिती दिली. चारही पत्नीने कोर्टात दावा दाखल केल्याची माहिती तिला मिळाली. तिने थेट पोलीस ठाणे गाठले. पतीविरोधात फसवणुकीची तक्रार दिली.
अडीच लाख हुंडा
पीडितेच्या घरी या लखोबाने आपण पोलीस दलात ठाणेदार असल्याची थाप मारली. त्याचा रूबाब असा होता की कोणी पण त्याला खरा पोलीसच समजत होता. लग्न ठरल्यावर त्याने पीडितेच्या कुटुंबाकडून अडीच लाख रुपये हुंडा पण घेतला. पण त्याचे वागणे आणि सासरकडील मंडळीच्या वागण्याचा पीडितेला संशय आला. तर शेजाऱ्यांनी तिला सावध केले. त्यानंतर तिने या लखोबाचा भांडाफोड केला. गुन्हा दाखल झाल्यापासून नवाबगंज पोलीस त्याचा शोध घेत आहेत.