कोण आहेत Ilker Ayci, जे Air Indiaचे नवे CEO झालेत, काय आहे तुर्कीश कनेक्शन?
Ilker Ayci in Air India : र्की एअरलाइनचे (Turkish airlines) माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांना एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (CEO) बनवण्यात आले आहे. टाटा सन्सचे (Tata sons) चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीतील बैठकीत हा निर्णय झाला.
Ilker Ayci in Air India : एअर इंडिया यामध्ये बदल सुरू झाला आहे. टाटा समूहाने सर्वप्रथम काम करण्याची पद्धत बदलण्यावर भर दिला आहे. या संदर्भात तुर्की एअरलाइनचे (Turkish airlines) माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांना एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (CEO) बनवण्यात आले आहे. टाटा सन्सचे (Tata sons) चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीत बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक झाली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 51 वर्षीय इल्कर ऐशी हे तुर्कीचे व्यापारी आहेत. 2015मध्ये त्यांची तुर्की एअरलाइन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. 26 जानेवारी 2022 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता त्यांना एअर इंडियाची कमान मिळाली आहे. आयसीने 1994मध्ये बिल्केंट युनिव्हर्सिटी ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन विभागातून शिक्षण पूर्ण केले. 1995मध्ये त्यांनी यूके विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. 1997मध्ये त्यांनी Marmara विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर कार्यक्रम पूर्ण केला.
‘मला सन्मान वाटतो’
1 एप्रिल 2022पासून ऐशी एअर इंडियाच्या कामकाजावर देखरेख करतील. नियुक्तीनंतर इल्कर ऐशी म्हणाले, की एअर इंडिया ही एक प्रतिष्ठित विमान कंपनी आहे. एअर इंडियाचा प्रमुख म्हणून टाटा समूहाशी निगडीत असल्याचा मला सन्मान वाटतो. एअर इंडियामधील आमच्या भागीदारांसोबत आणि टाटा समूहाच्या नेतृत्वासोबत जवळून काम करून, आम्ही एअर इंडियाला जगातील सर्वोत्तम एअरलाइन बनवण्यासाठी तिच्या मजबूत वारशाचा उपयोग करू.
इल्कर ऐशी हे विमान उद्योगातील एक मोठे नाव
त्यांच्या नियुक्तीबद्दल टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले, की इल्कर ऐशी हे विमान उद्योगातील एक मोठे नाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तुर्की एअरलाइनने मोठे यश मिळवले आहे. आम्ही त्यांचे टाटा समूहात स्वागत करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाला नवी ओळख मिळेल आणि नव्या युगाची सुरुवात होईल.
एअर इंडिया आणि एअर एशिया यांच्यात करार
प्रवाशांची सोय लक्षात घेऊन एअर इंडिया आणि एअर एशिया यांच्यात नुकताच करार झाला आहे. या कराराअंतर्गत एअर इंडियाचे तिकीट खरेदी करणारे प्रवासी एअर एशियाच्या फ्लाइटमध्ये उड्डाण करू शकतात, त्याचप्रमाणे जे लोक एअर एशियाचे तिकीट खरेदी करतात ते एअर इंडियाच्या विमानात उड्डाण करू शकतील. दोन्ही विमान कंपन्यांमधील या महत्त्वाच्या आणि मोठ्या करारामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून सेवेत काही अडचण आल्यास ते इतर विमान कंपनीच्या विमानात प्रवास करू शकणार आहेत.
#FlyAI : Mr. Ilker Ayci appointed as the CEO & MD of Air India. pic.twitter.com/KhVl0tfUlv
— Air India (@airindiain) February 14, 2022
आणखी वाचा :