Shark Tank India | बीडच्या दादासाहेबने शार्कच्या जजेसना जिंकलं, मिळवली मोठी गुंतवणूक, ऑफिस बॉय ते स्टार्टअप प्रेरणादायी प्रवास

Shark Tank India | शार्क टँक इंडियामुळे अनेक उद्योजकांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आपल्या उद्योगासाठी अधिकाधिक गुंतवणूक पदरात पाडून घेता येते. आता बीडच्या एका तरुण मुलाने आपल्या मेहनतीच्या बळावर शार्क टँक इंडिया पर्यंत मजल मारली. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने शार्कच्या जजेसना प्रभावित करुन गुंतवणूक पदरात पाडून घेतली.

Shark Tank India | बीडच्या दादासाहेबने शार्कच्या जजेसना जिंकलं, मिळवली मोठी गुंतवणूक, ऑफिस बॉय ते स्टार्टअप प्रेरणादायी प्रवास
Beed dadasaheb Bhagat Shark tank india
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 9:03 AM

Shark Tank India | सध्या छोट्या पडद्यावर शार्क टँक इंडिया हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या प्लॅटफॉर्मवर येणारा उद्योजक आपला बिझनेस प्लान सादर करतो. शार्कच्या जजेसना तो प्लान आवडला, तर उद्योगाला गुंतवणूक मिळते. बीडच्या दादासाहेब भगत या युवकाने आपल्या बिझनेस प्लानने शार्कचे जजेस अमन गुप्ता आणि राधिका गुप्ता यांना प्रभावित केलं. दादासाहेब प्रसिद्ध कंपनी इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून नोकरी करायचा. त्याआधी तो दैनंदिन रोजंदारीवर काम करायचा. त्याला दिवसाला 80 रुपये मिळायचे. दादासाहेबला डिजायनिंगची खूप आवड होती. त्याने मुजरीतून मिळणारी सर्व मिळकत डिजायनिंग शिकण्यासाठी वापरली.

दादासाहेब भगतमध्ये शिकण्याची आवड आणि जिद्द होती. प्रोग्रॅमिंग शिकण्यासाठी तो हैदरबादला गेला. तीन वर्ष तिथे राहून तो प्रोग्रॅमिंग शिकला. दादासाहेब डिझायनिंग हेड बनला. त्यानंतर त्याने मेड इन इंडिया डिजाईन सॉफ्टवेअर बनवण्याचा निर्णय घेतला. बीडमधल्या छोट्या गावातून प्रवास सुरु करणाऱ्या दादासाहेबच्या स्वप्नांना आता शार्क टँक इंडियाच्या 3 सीजनने बळ देण्याच काम केलं आहे. डिझायनिंगची ही जी आवड आहे, त्यातून कंपनी स्थापन करण्याच व्हिजन घेऊन दादासाहेब टँकच्या जजेससमोर आला.

दादासाहेबच्या कंपनीत किती कोटीची गुंतवणूक?

दादासाहेबने त्याचा प्लान शार्कच्या जजेससमोर मांडला. अमन गुप्ता त्याच्या कौशल्यावर, बिझनेस प्लानवर प्रचंड प्रभावित झाले. अमन गुप्ता यांनी दादासाहेबच्या कंपनीत 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक करण्याआधी शार्कच्या जजेसनी दादासाहेबची कल्पना समजून घेतली. त्याच उत्पादन, विक्री, नफा हे गणित समजून घेतल्यानंतर गुंतवणूक केली. मार्केटिंगच नाही, तर उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्याला जजेसनी दिला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.