VIDEO: पुलावरुन जाताना गाडी अचानक वळली अन् थेट नदीत कोसळली

Car Accident | सोशल मीडियावर एका कार अपघाताचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार वळण घेऊन नदीच्या पूलावर जाताना दिसत आहे. ही गाडी व्यवस्थित वळण घेऊन पुलावर येते.

VIDEO: पुलावरुन जाताना गाडी अचानक वळली अन् थेट नदीत कोसळली
कार अपघात
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 10:25 AM

मुंबई: सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होणाऱ्या किंवा लोकप्रिय ठरणाऱ्या कंटेटमध्ये अपघाताच्या गंभीर आणि मजेशीर अशा दोन्ही व्हीडिओंचा समावेश असतो. काही अपघात हे इतके भीषण असतात की, ते पाहून अंगावर शहारा येतो. तर अपघाताचे काही व्हीडिओ इतके विचित्र आणि मजेशीर असतात की, ते पाहून हसायल येते. सध्या सोशल मीडियावर एका कार अपघाताचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. (Car Accident Video goes Viral on Social Media)

व्हीडिओत नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर एका कार अपघाताचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक पांढऱ्या रंगाची कार वळण घेऊन नदीच्या पूलावर जाताना दिसत आहे. ही गाडी व्यवस्थित वळण घेऊन पुलावर येते. मात्र, त्याचवेळी चालकाने स्टेअरिंग जास्तच फिरवल्यामुळे ही सफेद कार जास्तच वळते आणि पुलावरून थेट खाली कोसळते. हा विचित्र अपघात पाहून आजुबाजूच्या लोकांना थोडावेळ काय झाले हेच समजत नाही. सुदैवाने पुलाची उंची कमी असल्याने गाडी नदीत तितक्याशा वेगाने कोसळत नाही. तसेच नदीतही पाणी कमी असल्याने गाडी बुडालेली नाही.

View this post on Instagram

A post shared by (@kamboj_firm)

व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. kamboj_firm या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा अपघात नेमका कुठे झाला, याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावरुन कारच्या ड्रायव्हरची खिल्ली उडविली आहे. त्यामुळे या व्हीडिओवर अनेक मजेशीर कमेंटस पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या:

VIDEO | साडा कुत्ता कुत्ता, तौडा कुत्ता टॉमी, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीचा चिमुरड्यासोबत भन्नाट व्हिडीओ

Video | सुस्साट वेगात दुचाकी चावलण्याचा प्रयत्न, पण मध्येच विचित्र अपघात, तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO | कार चालकाचा मृत्यूला वळसा, अपघातातून कसा वाचला जीव, व्हिडीओ पाहा

तात्या विंचूसारखा बसच्या मागच्या शिडीला लोंबकळून प्रवास, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Car Accident Video goes Viral on Social Media)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.