AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक से बढ़कर एक जुगाडू | Desi Jugaad Video : बसमध्ये सीट मिळवण्यासाठी असं काही करू नका, नाहीतर…

Jugaad Video for bus seat : तुम्ही देसी जुगाडचे एकापेक्षा एक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या जुगाडचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बस(Bus)मधील सीट(Seat)च्या विषयावरचा हा जुगाड (Jugaad) आहे. प्रवाशाने असे काय केले, की लोक हसत आहेत.

एक से बढ़कर एक जुगाडू | Desi Jugaad Video : बसमध्ये सीट मिळवण्यासाठी असं काही करू नका, नाहीतर...
बसमध्ये सीट मिळवण्यासाठी केलेला जुगाड
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 11:14 AM

Jugaad Video for bus seat : देशात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही. काही लोकांच्या आत इतके कौशल्य भरलेले असते, की पाहणाऱ्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. विशेषत: जेव्हा काही जुगाड होते. तुम्हीही इंटरनेट जगात सक्रिय असाल, तर तुम्ही देसी जुगाडचे एकापेक्षा एक व्हिडिओ पाहिले असतील. या लोकांचे डोके चालते कसे, असा विचारही अनेकजण करतात. त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला हसू तर येतेच पण तुम्ही विचारही करायला लागता. सध्या जुगाडचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून लोक हसत तर आहेत मात्र चिंताही व्यक्त करतानाही दिसतात. बस(Bus)मधील सीट(Seat)च्या विषयावरचा हा जुगाड (Jugaad) आहे. बसमधील प्रवाशाने असे काय केले, की लोक हसतही आहेत आणि चिंताही व्यक्त करत आहेत.

बसच्या सीटवर बसण्यासाठी जुगाड

बसमधील सीटबद्दल आपण भारतीय कधी कधी किती आक्रमक होतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कदाचित त्यामुळेच आपण बसमध्ये प्रवेश करताच आपली सीट आरक्षित करण्याचा विचार करतो, नाहीतर आपले काही सामान ठेवून सीट आरक्षित केली जाते. अगदी अलीकडच्या काळातही बसच्या सीटवर बसण्यासाठी असा जुगाड लावला होता, जो पाहून तुम्हीही म्हणाल, जबरदस्त भावा!

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की बसच्या मागील सीटच्या खिडकीजवळ एक पुरुष दिसत आहे आणि तो महिलेला बसमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. पुरुष खिडकीतून महिलेला हात देतो आणि त्या महिलेला पकडून खिडकीतून आत ओढतो. बसमधील सीटसाठी दोघांची धडपड सुरू असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एका दिवसात ९० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइक केले आहे.

‘जुगाडद्वारे काहीही अशक्य नाही’

जुगाडच्या या व्हिडिओवर यूझर्सनी त्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले, की जुगाडद्वारे काहीही अशक्य नाही. तर दुसऱ्या यूजरने व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले, की सीटची इतकी क्रेझ याआधी कधीच पाहिली नाही. दुसऱ्या यूजरने व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले, की जुगाडचा हा मार्ग धोकादायक आहे. याशिवाय इतरही अनेक यूझर्सनी त्यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली.

मजुराच्या जुगाडाचा ‘हा’ Video पाहून तुम्हीही म्हणाल, हे IITमध्ये का शिकवलं जात नाही?

Tap Tea : नळावर पाणी नाही चहा मिळतोय तोही फुकट! चहाप्रेमींनो, हा Viral Video तुमच्यासाठी आहे..!

Video : तेरी शकल गंदी, ओ नल्ली, बासी बर्फी तू कल की…; Srivalli गाण्याचं Siblings Version पाहिलं का?

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.