VIDEO : स्टेजवरुन नवरीला उचलून आणण्याचा प्रयत्न नवरदेवाच्या चांगलाच अंगलट आला, फजिती पाहून हसू आवरणार नाही
स्टेजखाली उपस्थित अनेक वऱ्हाडी नवरा-नवरीचा तो क्षण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी सज्ज होते. मात्र नवरदेवाच्या करामतीने चांगलीच फजिती झाली आणि ती कॅमेऱ्यात कैदही झाली.
दिल्ली : विवाह म्हटलं की अनेक गंमती-जमती आल्या. काही राग आणतात तर काही पोट धरुन हसायला लावतात. हल्ली लग्नांमध्ये नवरदेवाने नवरीला उचलून घेण्याचा, नवरा-नवरीने स्टेजवर डान्स करण्याचा ट्रेंड वाढलेला पहायला मिळतोय. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट हसल्याशिवाय राहणार नाही. लग्नानंतर स्टेटवरुन खाली उतरत असताना नवरदेव नवरीला उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा हा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसते.
काय आहे व्हिडिओमध्ये?
नवरदेव स्टेजवर आपल्या नववधूला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो नवरीला उचलतोही, मात्र त्याला स्वतःचा तोल सावरता येत नाही आणि नवरीसह तो ही खाली धाडकन पडतो.
लोगो के कहने पर ना चले अपने सामर्थ्य अनुसार ही कार्य करे, लोग आपकी गलतियों पर हसने को तैयार खड़े हैं। pic.twitter.com/bHKFgobkXu
— Hasna Zaroori Hai (@HasnaZarooriHai) January 2, 2023
स्टेजखाली उपस्थित अनेक वऱ्हाडी नवरा-नवरीचा तो क्षण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी सज्ज होते. मात्र नवरदेवाच्या करामतीने चांगलीच फजिती झाली आणि ती कॅमेऱ्यात कैदही झाली.
ट्विटवर शेअर करण्यात आलाय व्हिडिओ
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओखाली एक कॅप्शनही देण्यात आले आहे, ‘लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या कुवतीनुसारच काम करा. लोक तुमच्या चुकांवर हसण्यासाठी तयारच आहेत.’
व्हिडिओला हजारो व्ह्यूज
केवळ 30 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक केले असून, अनेक प्रतिक्रियाही देण्यात आल्या आहेत. व्हिडिओ पाहून युजर्सला हसू आवरत नाही आहे.