कितने तेजस्वी लोग हैं! Escalatorवर उलटं पळणारे हे तरूण पाहा, प्रवाहाविरूद्ध चालणं यालाच म्हणतात!

तुम्ही लिफ्ट आणि एस्केलेटर(Escalator)चा वापर अनेकवेळा केला असेल. एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दोन तरूण एस्केलेटरवर असं काही करताना दिसत आहेत, ज्याची तिथं उपस्थित असलेल्या कुणालाही अपेक्षा नसेल.

कितने तेजस्वी लोग हैं! Escalatorवर उलटं पळणारे हे तरूण पाहा, प्रवाहाविरूद्ध चालणं यालाच म्हणतात!
एस्केलेटरवर उलट्या दिशेनं धावणारे तरूण
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 11:45 AM

Escalator funny video : तुम्ही लिफ्ट आणि एस्केलेटर(Escalator)चा वापर अनेकवेळा केला असेल. आजकाल रेल्वे स्टेशनपासून मॉल्सपर्यंत या सुविधा आपल्या सर्वांना मिळत आहेत. खेड्यापाड्यात नाही, पण छोट्या शहरांमध्ये बांधलेल्या मॉल्स वगैरेमध्ये एस्केलेटर पाहायला मिळतील. शहरांमध्ये राहणार्‍या लोकांना याबद्दल चांगलं माहीत आहे, परंतु ग्रामीण राहणार्‍या बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही, मग एस्केलेटरवर चढण्यासाठी काय करावं? एस्केलेटरवर अनेकांना मजा करतानाही तुम्ही पाहिलं असेल. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दोन तरूण एस्केलेटरवर असं काही करताना दिसत आहेत, ज्याची तिथं उपस्थित असलेल्या कुणालाही अपेक्षा नसेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही लोक एस्केलेटरच्या मदतीनं वर चढत आहेत तर काही एस्केलेटरवरून खाली येत आहेत. त्याचवेळी दोन तरुण आउट ऑफ द बॉक्स काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अनोखी स्टाइल

हे तरूण उतरत्या एस्केलेटरवरून वर जाण्याचा प्रयत्न करतात आणि वरच्या दिशेनं वेगाने चढतात. अखेरीस, अनोख्या शैलीत वर चढतात. मौज मजा करण्याची ही एक अनोखी स्टाइल आहे. कधी कधी त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो. काही माणसं पडू शकतात, पण असं काहीही या व्हिडिओत दिसत नाही.

ट्विटर हँडलवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि मजेशीरपणे कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘काय आश्चर्यकारक लोक!’ अवघ्या 6 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे.

मजेशीर कमेंट्स

व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं आहे, की मी माझा फिटनेस दाखवत आहे’, तर दुसऱ्या यूझरनं ‘तुम्हाला हसवण्यासाठी काहीही करेन’ अशी कमेंट केली आहे. त्याचप्रमाणं आणखी एका यूझरनं ‘याला प्रवाहाविरुद्ध चालणं म्हणतात’ असं मजेशीरपणे लिहिलं आहे.

Video : ‘या’ पक्ष्यांना पाहून तुम्हीही म्हणाल, ‘ही बटालियन आहे की संपूर्ण सेना!’

Nagin Dance Viral Video : भौतिकशास्त्राचे सर्व नियम मोडणारा ‘असा’ नागीण डान्स पाहिला नसेल, हसून हसून लोटपोट व्हाल!

कोळी नव्हे चित्रकारच जणू! पाहणाऱ्यालाही अडकवतो आपल्या ‘जाळ्या’त, Video Viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.