Video : परदेशी ‘गंगुबाई’, व्हीडिओ एकदा बघाच, बघताक्षणी डान्सरच्या प्रेमात पडाल… गॅरेंटी!
सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. एका मुलाने घागरा घालून आलियाच्या गंगुबाईमधल्या गाण्यावर डान्स केलाय. जो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. ज्याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. Jainil Mehta या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.
मुंबई : आलिया भट (Alia Bhatt) सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा प्रचंड कौतुक झालं.तिच्या या सिनेमातील भूमिकेचं विशेष कौतुक झालं. या सिनेमातील तिचे डायलॉग सोशल मीडियावरव ट्रेड करत आहेत. गाणी तर सुपरहिट ठरली. अश्यातच आता एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जो थेट परदेशातील आहे. एका मुलाने घागरा घालून आलियाच्या गंगुबाईमधल्या ‘झूम रे गोरी’ गाण्यावर डान्स केलाय. जो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय.
व्हायरल व्हीडिओ
सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. एका मुलाने घागरा घालून आलियाच्या गंगुबाईमधल्या गाण्यावर डान्स केलाय. जो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. ज्याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. Jainil Mehta या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. “माझ्यासाठी हे नृत्यदिग्दर्शन नाही, तर रस्त्यावर नाचणे आणि लोकांशी संवाद साधणे हा आहे! माझ्यासाठी हे गाणे मी किती चांगले नृत्य आणि नृत्यदिग्दर्शन करू शकतो याबद्दल नाही तर मी संगीताचे योग्य सार किती चांगले व्यक्त करू शकतो आणि आणू शकतो! याचा आहे” ,असं या व्हीडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘झूम रे गोरी’ या लोकप्रिय गाण्यावर तो डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती अमेरिकेच्या रस्त्यावर नाचत आहे. या तरूणाचा डान्स जबरदस्त आहे. त्याने कुर्ता आणि स्कर्ट परिधान करत डान्स केलाय त्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलं जात आहे. नृत्यदिग्दर्शक जैनील मेहता यांचा हा व्हीडिओ आहे. जैनील हे उत्कृष्ट नृत्य दिगदर्शक आहेत. ते विविध व्हीडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.
View this post on Instagram
जैनील मेहताने पुष्पामधील सामी-सामी गाण्यावरही डान्स केलाय याचाही व्हीडिओ त्याने शेअर केला आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या