SSC results 2022: एय ‘आई’शाब्बास! आई से पंगा नहीं लेनेका! तिच्या विचारात धाडस, तिच्या मेहनतीत धाडस…

1996 साली दहावीची परीक्षा दिलेली व्यक्ती आपल्या मुलासोबत जेव्हा 2022 मध्ये परत परीक्षेला बसायचा विचार करते तेव्हा त्या विचारला धाडस म्हणतात, बदललेला अभ्यासक्रम, कोरोनामुळे बदलेले परीक्षेचे नियम, स्वतःचा मुलगा ऑनलाईन अभ्यास करत असताना आपणही तेच करणं या सगळ्याला धाडस लागतं.

SSC results 2022: एय 'आई'शाब्बास! आई से पंगा नहीं लेनेका! तिच्या विचारात धाडस, तिच्या मेहनतीत धाडस...
'आई'शाब्बास!Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:12 PM

मुंबई: गीता अजयकुमार पासी म्हणतात, “मला सकाळीच टेन्शनने जाग यायची. पाच वाजता उठून अभ्यासाला बसायचे. आपण जर नापास झालो तर मुलाला कसं तोंड दाखवणार असं वाटायचं. मुलगासुद्धा दहावीला (SSC Exam) त्यामुळे डबल टेन्शन! आज जेव्हा निकाल (SSC Results 2022) लागला तेव्हा डोळ्यात पाणीच आलं, मुलाला 74 टक्के मिळाल्याचा आणि सोबत मीही पास झाल्याचा मला आनंद आहे.” कधी कधी नुसत्या परीक्षेला बसायचा विचार करण्यालाही धाडस लागतं. TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये (TV9 Marathi Office) हाऊस किपींगचं काम करणाऱ्या गीता पासी यांनी हे धाडस केलंय. 1996 साली दहावीची परीक्षा दिलेली व्यक्ती आपल्या मुलासोबत जेव्हा 2022 मध्ये परत परीक्षेला बसायचा विचार करते तेव्हा त्या विचारला धाडस म्हणतात, बदललेला अभ्यासक्रम, कोरोनामुळे बदलेले परीक्षेचे नियम, स्वतःचा मुलगा ऑनलाईन अभ्यास करत असताना आपणही तेच करणं या सगळ्याला धाडस लागतं.

पतीने दिलं प्रोत्साहन!

गीता पासी यांनी 1996 साली दहावीची परीक्षा दिली. त्या परीक्षेत इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास या विषयात त्या नापास झाल्या. घरी आर्थिक अडचण, त्यानंतर लग्न, संसार या सगळ्यात दहावीची परीक्षा पुन्हा देणं शक्य झालं नाही. पण स्वतःचा मुलगा जेव्हा दहावीच्या परीक्षेला बसला तेव्हा पतीने परीक्षेला बसायचं प्रोत्साहन दिलं. आज दहावीचा निकाल लागला त्यात गीता इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल या सगळ्या विषयात पास झाल्या. TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये त्यांचं हे यश केक कापून उत्साहात साजरं केलं गेलं.

विचार करायला धाडस लागतं

गीता यांचा मुलगा आर्यन अजयकुमार पासी हा देखील 74 टक्के गुण मिळवून पास झालाय.आपण पास, मुलगाही उत्तम गुणांनी पास म्हटल्यावर गीता यांचा आनंद गगनात मावेना! आई आणि मुलगा दोघेही सोबत अभ्यास करायचे. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अभ्यास, त्यात बदलेला अभ्यासक्रम, बदलेले परीक्षेचे नियम या सगळ्यावर आज गीता यांनी पती आणि मुलाच्या साहाय्याने मात केलीये. काही गोष्टींचा विचार करायला धाडस लागतं, विचार केल्यावर त्यानुसार मेहनत घ्यायला तितकं सातत्य लागतं हे गीता पासी यांनी दाखवून दिलंय.

हे सुद्धा वाचा
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.