Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghibli Trend च्या वाहत्या गंगेत तुम्हीसुद्धा शेअर केले फोटो? जाणून घ्या त्यामागचं भयावह सत्य

घिबली ट्रेंडमध्ये सहभागी होऊन तुम्हीसुद्धा तुमचे खासगी फोटो शेअर केले आहेत का? फोटो शेअर करण्याआधी तुम्ही संबंधित प्लॅटफॉर्मची प्रायव्हसी पॉलिसी वाचली का? तुमचे फोटो आणि तुमचा डेटा त्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षित आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या..

Ghibli Trend च्या वाहत्या गंगेत तुम्हीसुद्धा शेअर केले फोटो? जाणून घ्या त्यामागचं भयावह सत्य
ghibli style imageImage Credit source: ChatGPT
Follow us
| Updated on: Apr 02, 2025 | 1:33 PM

सोशल मीडियावर असंख्य नवनवे ट्रेंड्स येतात आणि त्या ट्रेंडच्या वाहत्या गंगेत अनेकजण आपलेही हात धुवून घेतात. एखादा नवीन ट्रेंड आला की लगेचच त्याला फॉलो करणारे असंख्य लोक असतात. सध्या असाच एक ट्रेंड सुरू आहे, तो म्हणजे ‘घिबली ट्रेंड’. तुम्ही तुमचा कोणताही फोटो AI Ghibli Style क्र‍िएटर टूलमध्ये अपलोड केला की अवघ्या काही सेकंदात त्याचा घिबली स्टाइल ॲनिमेटेड फोटो तयार होतो. हे फोटो इतके सुंदर असतात की आपणसुद्धा त्या ट्रेंडमध्ये सहभागी व्हावं, अशी आपसूकच इच्छा होते. परंतु तुम्ही कधी विचार केला का, की तुम्ही अपलोड केलेले तुमचे प्रायव्हेट फोटो कुठे जातात? आज तुम्ही क्षणाचाही विचार न करता ट्रेंडमुळे तुमचे फोटो सर्रास त्या ॲपसोबत शेअर करत आहात. परंतु तुमचे खासगी फोटो या एआय प्लॅटफॉर्मवर सेव्ह केले जात आहेत आणि भविष्यात ते कसे वापरले जाऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

ट्रेंडच्या वाहत्या गंगेत शेअर केले फोटो?

ChatGPT आणि Grok यांसारख्या प्लॅटफॉर्म्सद्वारे सुरू झालेल्या ट्रेंडमध्ये लोकांनी आपापले अनेक फोटो अपलोड केले आहेत. यात सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. सोशल मीडियावर असंख्य लोक घिबली स्टाइल फोटो अपलोड करत आहेत. या ट्रेंडमध्ये फोटो शेअर करताना कोणीही डिजिटल प्रायव्हसीची काळजी घेत नाही. परंतु याचा विचार आता नेटकऱ्यांनी करायला हवा. कारण तुम्ही ज्या एआय टूल्सवर हे फोटो शेअर करत आहात, तो प्लॅटफॉर्म केवळ तुमचे फोटो साठवत नाहीये तर त्यांच्या प्रशिक्षणासाठीही त्यांचा वापर करत आहे.

हे सुद्धा वाचा

ChatGPT वर तुमचा डेटा सुरक्षित आहे का?

सायबर एक्स्पर्ट आधीच या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. पण जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की एआय तुमचा डिजिटल डेटा सुरक्षित ठेवणार का, तर त्याबद्दल स्वत: AI काय म्हणतंय, ते जाणून घेऊयात. ChatGPT ला यासंदर्भात प्रश्न विचारला गेला की, ‘घिबली आर्ट बनवण्यासाठी अनेक खासगी फोटो प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहेत. त्यावर हे फोटो साठवले जात आहेत का?’ त्यावर एआयने काय उत्तर दिलं, ते पाहुयात..

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

AI ने या ट्रेंडला फक्त असुरक्षित असल्याचं म्हटलं नाही तर तुमचा खासगी डेटा तिथे साठवला जात असल्याबद्दलही सांगितलं आहे. जर तुम्ही तुमचे वैयक्तिक फोटो कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असाल तर ते पूर्णपणे सुरक्षित मानले जाऊ शकत नाही.

तुमचे फोटो प्लॅटफॉर्मवर स्टोअर होतात का?

उत्तर- हो.. बहुतांश ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स (जसं की इमेज जनरेशन टूल्स, सोशल मीडिया साइट्स) हे अपलोड केलेले फोटो त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर करू शकतात. काही प्लॅटफॉर्म्स तात्पुरत्या स्वरुपात हे इमेज स्टोअर करतात, तर काही जास्त कालावधीसाठी ते फोटो सेव्ह करू शकतात.

तुमचे फोटो सार्वजनिक होऊ शकतात का?

उत्तर- अनेक प्लॅटफॉर्म्सवर तुमचे फोटो इतर युजर्ससाठी उपलब्ध असू शकतात. खासकरून ज्या प्लॅटफॉर्म्समध्ये पब्लिक गॅलरीचं फीचर असतं. त्यामुळे आधी प्रायव्हसी पॉलिसी वाचा आणि तुमच्या फोटोंचा वापर AI मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी किंवा इतर उद्देशांसाठी होतोय का, हे जाणून घ्या. अनेकजण प्रायव्हसी पॉलिसी वाचण्याचा कंटाळा करतात आणि लगेचच त्या बॉक्सवर क्लिक करतात.

तुमच्या फोटोंचा कोणी गैरवापर करू शकतो का?

उत्तर- हो.. जर त्या प्लॅटफॉर्मची सुरक्षा मजबूत नसेल तर तुमचे फोटो लीक होऊ शकतात. त्यानंतर त्यांचा दुरुपयोग टाळता येत नाही. उदाहरणार्थ फेक प्रोफाइल बनवणं, AI डीपफेक इमेज जनरेशन वगैरे..

सुरक्षेचे उपाय काय?

प्रायव्हसी सेटिंग्स तपासून पाहा. तुमचे फोटो फक्त तुमच्यासाठी किंवा एका मर्यादित समूहासाठी उपलब्ध असतील याची खात्री करून घ्या. संवेदनशील फोटो अपलोड करू नका. प्रायव्हेट फोटो अपलोड करू नका. प्लॅटफॉर्मच्या अटी आणि शर्थी वाचून घ्या. तुमच्या फोटोंचा आणि डेटाचा उपयोग कशासाठी केला जाईल, ते वाचून घ्या. AI टूल्सना तुमचे फोटो सेव्ह करू देऊ नका. जर प्लॅटफॉर्मवर इमेज डिलिट करण्याचा पर्याय असेल तर त्याचा उपयोग करा.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.