JustForLaugh : Viral Videoमध्ये काय म्हणतेय ही मुलगी, ज्यानंतर मित्र हसायला लागले!
सोशल मीडिया(Social Media)वर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहेत. असाच एक व्हिडिओ या प्रकारामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. हा मजेदार (Funny) व्हिडिओ एका आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केला आहे.
Funny Short Video : सोशल मीडिया(Social Media)वर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहेत. जिथे यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं, तर काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात, की ते पाहिल्यानंतर तुम्ही हसायला लागता. असाच एक व्हिडिओ या प्रकारामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणींमध्ये अशी एक गोष्ट बोलते, जी ऐकल्यानंतर हसून हसून तुमचं पोट नक्कीच दुखायला लागेल. हा मजेदार (Funny) व्हिडिओ एका आयपीएस अधिकाऱ्यानं शेअर केला आहे. तसेच, कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की मुलांना पालकांपेक्षा चांगलं कोण ओळखतं! या व्हिडिओला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे.
मित्रही हसतात
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही मुले-मुली शेकोटीचा आनंद लुटताना दिसत आहेत. यादरम्यान एक मुलगी म्हणते, ‘माझ्यात आणि माझ्या प्रियकरामध्ये 36 पैकी 36 गुण जुळत होते. पण आमच्या घरच्यांनी आमचं जुळू दिलं नाही. जशी नालायक मुलगी आहे, तसा ना नालायक जावई नको, असं घरचे म्हणतायत, असं ती व्हिडिओत बोलताना दिसून येते. यानंतर व्हिडिओमध्ये गाणं सुरू होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुलीचं बोलणं ऐकून तिथं बसलेले तिचे मित्रही हसायला लागतात.
ट्विटरवर शेअर
हा मजेदार व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘पालकांपेक्षा मुलांना कोण चांगलं समजतं! तसेच हा व्हिडिओ आपल्याला व्हाट्सअॅपवरून मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. ट्विटरवर अपलोड झाल्यापासून हा व्हिडिओ 4 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 400हून अधिक लोकांनी या पोस्टला लाइक केलं आहे. सोशल मीडिया यूझर्स या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
बच्चों को माँ-बाप से बेहतर कौन समझता है! ??#JustForLaugh.
VC- WhatsApp. pic.twitter.com/0UNJeiCAJg
— Dipanshu Kabra (@ipskabra) January 26, 2022
‘ऑनलाइन शिकणारी ही मुलं’
व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरनं लिहिलंय, की काय सर तुम्ही सुद्धा.’ त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, ‘ऑनलाइन शिकणारी ही मुलं आहेत.’ त्याचवेळी, बहुतेक यूझर्सनी इमोटिकॉन्सच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एकूणच यूझर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.