Viral : ‘पापा की परी अंकल को ले उडी’, स्कूटर शिकणाऱ्या लाडलीनं काय केलं? पाहा Funny video

Girl funny video : सोशल मीडियावर (Social media) असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहेत, ज्यामध्ये काही लोक गाडी चालवताना पडतात किंवा लोकांना इजा करतात. इंटरनेटवर स्कूटी (Scooty) चालवणाऱ्या मुलींचे व्हिडिओही खूप ट्रोल झाले आहेत. असाच हा एक व्हिडिओ आहे.

Viral : 'पापा की परी अंकल को ले उडी', स्कूटर शिकणाऱ्या लाडलीनं काय केलं? पाहा Funny video
स्कूटर चालवायला शिकणारी तरुणी वडिलांनाच जाऊन धडकली
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 5:58 PM

Girl funny video : सोशल मीडियावर (Social media) असे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहेत, ज्यामध्ये काही लोक गाडी चालवताना पडतात किंवा लोकांना इजा करतात. बहुतेक असे दिसून आले आहे की कार शिकत असताना, त्यांना एक्सीलेटर कसे नियंत्रित करावे हे पुरेसे समजत नाही. वाहनाचा चालकच नाही तर समोरची व्यक्तीही अपघाताचा बळी ठरते. इंटरनेटवर स्कूटी (Scooty) चालवणाऱ्या मुलींचे व्हिडिओही खूप ट्रोल झाले आहेत. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. ट्रोलर्स अशा मुलींना ‘पापा की परी’ म्हणतात. असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही हसाल. होय, इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, की एक मुलगी घराच्या अंगणात कशी स्कूटी चालवायला शिकत आहे. ती गाडीवर बसली आणि तिला मार्गदर्शन करण्यासाठी एक काका तिथे आहेत.

काकांना झाली असावी दुखापत

स्कूटीचा एक्सलेटर हळू वाढवण्यास काकांनी त्या मुलीला सांगितले. मात्र मुलीने त्याकडे लक्ष दिले नाही आणि घराच्या अंगणातच तिचा अपघात झाला. मुलीने एक्सलेटर चालू करताच तिचा तोल गेला आणि ती स्कूटीसह काकांच्या अंगावर जाऊन धडकली. मुलीला फारसा त्रास झाला नसला तरी काकांना किरकोळ दुखापत झाली असावी, असे व्हिडिओत तरी दिसते.

इन्स्टाग्रामवर शेअर

मुलीने स्कूटी टाकताच काकाही जमिनीवर कोसळले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मुलगी स्कूटीवरून पडली तेव्हा ती हसायला लागली. यावर काकाही संतापले. व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसतो. मात्र, यानंतर त्या मुलीला काकांचा ओरडा पडला असावा. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक हसत आहेत. इन्स्टाग्रामच्या अनेक मीम पेजवर तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत. एका यूझरने लिहिले, की काकांचा लूक असा काही होता, की स्कूटी देऊन चूक केली, सायकल दिली असती तर बरे झाले असते, असे त्यांना वाटत असावे.

View this post on Instagram

A post shared by Be Harami (BH) (@be_harami)

आणखी वाचा :

‘अतिशहाणा त्याचा…’ ‘हे’ महाशय असं काही करायला गेले अन् धपकन् आपटले, Viral video पाहा

‘या’ माणसाला पाहुन का पळताहेत लोक? Viral Prank videoवर यूझर्सही संतापले, असं आहे तरी काय यात?

Cat cute video : साधंसुधं नाही, सुरातलं मॅव मॅव आहे हे..! मांजरीचं असं smart singing चुकवू नका!

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.