Viral video : छेड काढणाऱ्याला मुलीनं दाखवला हिसका; Social media users म्हणतायत, बहुत सही किया
Holi video : होळीचा सण आणि धुलीवंदन नुकताच मोठ्या उत्साहात देशभर साजरा झाला. यासंबंधी एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. रंग खेळण्याच्या बहाण्याने मित्र कसा गैरफायदा घेतात, ते यात दिसून येते.
Holi video : होळीचा सण आणि धुलीवंदन नुकताच मोठ्या उत्साहात देशभर साजरा झाला. यादिवशी प्रत्येकजण आणि विशेषत: तरुणाई मोठ्या जोश-जल्लोषात धूळवड साजरी करत असते. एकमेकांना रंग लावणे, रंग असलेले पाणी मित्रांच्या अंगावर ओतणे, त्यांना भिजवणे आणि मौज करणे हे यादिवसाचे वैशिष्ट्य असते. खरे तर या दिवशी एकमेकांमधला कलह, राग, द्वेष अशा गोष्टी विसरून सर्वांनी एकत्र येत सण साजरा करणे हाच उद्देश असतो. काहीजण मात्र याचा गैरफायदा घेतात. अनेक ठिकाणी अनावश्यक किंवा गैरप्रकार होत असतात. मुलींची छेड काढण्यासारखेही प्रकार घडतात. त्यांना आवर घालण्यासाठी मग रुद्रावतार घ्यावाच लागतो. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. रंग खेळण्याच्या बहाण्याने मित्र कसा गैरफायदा घेतात, ते यात दिसून येते.
घेतला रुद्रावतार
व्हिडिओमध्ये बहीण-भाऊ आणि दोन मित्र असे चौघे दिसत आहेत. मुलीला आपल्या मित्रांसोबत रंग खेळायला जायचे असते. भाऊ तिला समजावून सांगतो, की ती मुले काही चांगली नाहीत, तू जाऊ नको. पण बहीण मानत नाही आणि ती तिच्या मित्रांबरोबर धूळवड साजरी करण्यासाठी जाते. पण तिथे तिला वाईट अनुभव येतो. मग ती पळत पळत आपल्या भावाकडे येते आणि सर्व सांगते. त्यानंतर भाऊ तिला असे काही समजावून सांगतो, की तिला रुद्रावतार घ्यावाच लागतो. ती आपल्या छेड काढण्याचा बदला त्या मित्रांकडून घेते. कसा, ते व्हिडिओमध्ये पाहा…
यूट्यूबवर अपलोड
संदेश देणारा हा व्हिडिओ यूट्यूबवर सागर कालरा शॉर्ट्स (sagar kalra Shorts) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 18 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 4.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘Is video ke liye ek like toh banta hai‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. यूझर्स या व्हिडिओचे कौतुक करत आहेत.