#IWD2022 : महिलांच्या धैर्य, त्याग आणि आत्मविश्वासाला Googleनंही केला सलाम!
Google Doodle : 8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा केला जात आहे. यानिमित्त गुगलने महिलांसाठी अॅनिमेटेड (Animated) स्लाइड शो (Slideshow) डूडल स्वतःच्या शैलीत समर्पित केले आहे, हे डूडल आर्ट डायरेक्टर थोक मायर यांनी तयार केले आहे.
Google Doodle : 8 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत गुगलने महिलांच्या सन्मानार्थ खास अॅनिमेटेड (Animated) स्लाइड शो (Slideshow) डूडल स्वतःच्या शैलीत समर्पित केले आहे, हे डूडल आर्ट डायरेक्टर थोक मायर यांनी तयार केले आहे. या डूडलमध्ये समाजातील महिलांच्या विविध भूमिकांचे चित्रण करण्यात आले आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या ना कोणत्या थीमवर आधारित असतो. यावेळची थीम आहे – शाश्वत उद्यासाठी म्हणजेच भविष्यासाठी आज स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे (Gender equality today for a sustainable tomorrow). गुगलने महिला दिनानिमित्त एक अतिशय क्रिएटिव्ह डूडल बनवले आहे. ज्यामध्ये विविध संस्कृतीतील महिलांच्या दैनंदिन जीवनाची झलक अॅनिमेटेड स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. याशिवाय महिलांचा संयम, त्याग, आत्मविश्वास यांचेही चित्रण करण्यात आले आहे.
काम करणाऱ्या आईपासून ते टेक फ्रेंडली महिलेचा प्रवास
अॅनिमेटेड स्लाइडशो सुरू होताच, एक आई तिच्या मुलाला हातात घेऊन लॅपटॉपवर काम करताना दिसते. दुसऱ्या स्लाइडमध्ये एक महिला हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेबाबत सूचना देताना दिसत आहे. त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये एक महिला रोपांना पाणी देताना दिसत आहे. एकंदरीत, काम करणाऱ्या आईपासून ते टेक फ्रेंडली महिलेपर्यंत, गुगलने आपल्या डूडलद्वारे अतिशय मनोरंजक पद्धतीने ही ओळख करून दिली आहे. चला तर मग हे डूडल पाहू या.
New Google Doodle has been released: “International Women’s Day 2022” 🙂#google #doodle #designhttps://t.co/aKtbxcLbSy pic.twitter.com/PxvXdlEqOm
— Google Doodles EN (@Doodle123_EN) March 7, 2022
1911मध्ये पहिल्यांदा साजरा झाला महिला दिन
तुम्ही पाहू शकता, की गुगलने आपल्या डूडलद्वारे महिला घरगुती कामापासून ते अंतराळापर्यंत सर्व गोष्टी कशा हाताळू शकतात हे सांगितले आहे. महिलांनाही प्रत्येक क्षेत्रात खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाला समर्पित आहे. हा विशेष दिवस लैंगिक समानता आणि महिला अधिकारांवर केंद्रित आहे. 1911मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला होता, परंतु त्यावेळी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. संयुक्त राष्ट्र संघाने 8 मार्च 1975 रोजी महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली.