Viral : ‘या’ हंसांनी माशांशी मैत्री केलीय की काय? 16 दशलक्षाहून अधिकवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Video
प्राण्यां(Animals)शी संबंधित व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असतात. सध्या सोशल मीडियाच्या जगात असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये एक हंस माशांना धान्य खाऊ घालताना दिसतोय.
प्राण्यां(Animals)शी संबंधित व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral) होत असतात. यापैकी बहुतेक, यूझर्सना प्राण्यांमधील अनोख्या मैत्रीचे व्हिडिओ पाहायला आवडतात. प्राणी आपली प्रजाती सोडून इतर प्राण्यांशी मैत्री करतात, असं अनेकवेळा दिसून आलंय. विशेषत: जेव्हा हे दोघे एकमेकांचे शत्रू असतात तेव्हा ते अधिक मनोरंजक वाटतं. सध्या सोशल मीडियाच्या जगात असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये एक हंस माशांना धान्य खाऊ घालताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
हंस आणि माशांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नदीतल्या खडकाजवळ एक हंस माशांना प्रेमानं खाऊ घालत आहे. व्हिडिओमध्ये पिंजऱ्यात ठेवलेलं धान्य चोचीत भरून हंस ज्या पद्धतीने माशांना खाऊ घालत आहे, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतोय. कारण हंस आणि मासे यांच्यात अशी मैत्री कधीच पाहायला मिळत नाही. हंस नेहमीच माशांची शिकार करत असतो. पण या व्हिडिओमध्ये तर सगळंच अगदी उलट दिसतंय. शिकार करण्याऐवजी हंस माशांवर आपलं प्रेम उधळतोय.
अवघ्या काही सेकंदांचा व्हिडिओ, मात्र..
हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा आहे, मात्र या अनोख्या मैत्रीच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळच उडवून दिलाय. हा व्हिडिओ ब्यूटिफुल ग्राम नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. लोकांना हा व्हिडिओ किती आवडला, याचा अंदाज यावरून लावता येतो, की आतापर्यंत याचे लाइक्स आणि व्ह्यूज. 16 लाखांहून अधिक लोकांनी याला लाइक केलंय आणि ही संख्या सातत्यानं वाढतेय. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूझर्सच्या मनात एकच प्रश्न आहे, की हंस आणि मासे यांचीही मैत्री असू शकते का?
View this post on Instagram
यूझर्सची मतं वेगवेगळी
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सची मतं वेगवेगळी आहेत. काही लोक हंस आणि मासे यांच्यातल्या अनोख्या मैत्रीविषयी सांगत आहेत. तर काही जणांच्या मते, खाऊ घातल्यानंतर त्यांचीच शिकार तो करणार. मुद्दा काहीही असो, मात्र व्हिडिओ पाहून वारा उलट्या दिशेनं वाहत असल्याचं दिसून येतंय.