जेवण आणि दारू फ्री, भरती प्रक्रियेची अनोखी जाहिरात! ग्रेप फिडींगचं काम
एक हायफाय रेस्टॉरंट आपल्या रेस्टॉरंटमध्ये ग्रेप फिड करू शकतील अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे
तुम्ही सोशल मीडियावर किंवा वर्तमानपत्रात नोकरीच्या अनेक प्रकारच्या जाहिराती पाहिल्या असतील. पण अर्थातच अशी जाहिरात आजपर्यंत कुणी पाहिली नसेल. रेस्टॉरंटच्या या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अशा नोकरीसाठी पगार मिळाला म्हणजे आयुष्यात मजा येईल, असा अनेकांचा समज आहे. तुम्हीही बघा आणि सांगा तुम्हाला काय वाटतंय.
लंडनमधील एक हायफाय रेस्टॉरंट आपल्या रेस्टॉरंटमध्ये ग्रेप फिड करू शकतील अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे.
‘द सन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, बाचनालिया नावाच्या या रेस्टॉरंटने या कामासाठी वर्तमानपत्रात जाहिरातीही छापल्या होत्या. पाहा ही व्हायरल जाहिरात…
View this post on Instagram
या जॉब प्रोफाइलसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे हात सुंदर असावेत आणि लॅटिन आणि ग्रीक भाषा येणं अनिवार्य आहे.
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीनुसार नोकरीसाठी निवड झालेल्या व्यक्तीला चांगल्या पगाराव्यतिरिक्त काही सुविधाही मिळणार आहेत. या वैशिष्ट्यांमध्ये मॅनिक्युअर,जेवण आणि फ्री पेयांचा समावेश आहे.
रेस्टॉरंटच्या ग्राहकांना हाताने द्राक्षे खाऊ घालण्यामागील, ग्रेप फिडर ठेवण्यामागील कारण म्हणजे रोम आणि ग्रीसच्या वैभवशाली काळाची आठवण करून देणे. रेस्टोरंटची तशी थीम च आहे.
सोशल मीडियावर ही जाहिरात अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स या नोकरीवर वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसले. काहींना ही कल्पना आवडली, तर काहींना ती निरुपयोगी वाटली.