आज ना छोडूंगी तुझे…. नवरीने 20 किलोमीटर थरारक पाठलाग करून अखेर…

लग्नाला अवघा काही कालावधी उरलेला असताना वधू तयार होऊन वाट बघत होती. मात्र तेव्हाच काही कारणामुळे त्रस्त असलेल्या वराने लग्नमंडपात न येता पळ काढला.

आज ना छोडूंगी तुझे.... नवरीने 20 किलोमीटर थरारक पाठलाग करून अखेर...
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 11:38 AM

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली येथे झालेल्या एका लग्नाची (marriage) सध्या खूपच चर्चा आहे. लग्न लागायच्या अवघे काही क्षण आधी नवरा मुलगा (groom ran away from marriage) वरातीतून पळून गेल्याचे वधूला कळले. मात्र त्यामुळे रडत न बसता नवरीने 20 किलोमीटर थरारक पाठलाग करून अखेर वराला पकडले त्याच्याशीच लग्न केले. त्या दोघांचाही प्रेमविवाह होता, पण लग्न लागण्याच्या काही क्षण आधीच नवऱ्या मुलाने कच खाल्ली आणि तो पळाला.

तो पळ काढण्याच्या तयारीत

लग्नाची ही अजब-गजब गोष्ट बरेलीतील बारादरी भागातील पुराना शहर येथील आहे. तेथे एक तरूणी वधूच्या वेशात तयार होती, पण तेव्हाच तिला कळलं नवरा मुलगा हा लग्नास तयार नाही. तो पळून जाण्याच्या तयारीत आहे. हे ऐकल्यावर वधूने लगेच त्याला फोन केला असता तो म्हणाला की मी आईला आणण्यासाठी बदायूं येथील घरी जात आहे. पण हे ऐकूनही वधूचे समाधान झाले नाही, तिला कसली तरी शंका आली अन् ती वराच्या शोधार्थ बाहेर पडली.

मंदिरात केले लग्न

बराच वेळ शोध घेतल्यानंतर नवरा मुलगा हा शहराबाहेरील एका पोलिस स्टेशन जवळील एका बसमध्ये बसलेला दिसला. नवरीने त्याला लगेचच बसमधून खाली उतरवले आणि जवळच्याच मंदिरात घेऊन गेली. तेथे त्या दोघांनी लग्न केले. सोशल मीडियावर दोघांच्याही लग्नाचे फोटो खूप व्हायरल होत असून या आगळ्या वेगळ्या लग्नाची बरीच चर्चाही सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होतं. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ते एकत्र होते. दोघांचेही कुटुंबियही लग्नासाठी तयार झाल होते. लग्नाची पूर्ण तयारीही झाली पण त्यापूर्वी वराचे मन बदलले आणि त्याने कच खात ऐनवेळी लग्नास नकार दिला. वधूला ही गोष्ट कळताच तिने तत्काळ धाव घेत 20 किलोमीटरपर्यंत जाऊन वराचा शोध घेतला आणि त्याच्याशीच लग्न केले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.