सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्या नावावर ! ‘या’ ठिकाणी बनते, चपाती बघण्यासाठी लाखोंची गर्दी

सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही भारताच्या नावावर आहे. सर्वात मोठ्या चपातीचे वजन सुमारे 145 किलो होते. सर्वात मोठी चपाती खास प्रसंगी बनवली जाते आणि ही एक चपाती शेकडो लोकांचे पोट भरते. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात मोठी चपाती भारतातील कोणत्या शहरात बनवली जाते.

सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्या नावावर ! 'या' ठिकाणी बनते, चपाती बघण्यासाठी लाखोंची गर्दी
Biggest chapati in the world jamnagar gujaratImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 11:51 AM

गांधीनगर: भारतीय खाद्यपदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. परदेशी लोकही भारतीय खाद्यपदार्थ मोठ्या आवडीने खातात. चपाती हा भारतीय जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि नानपासून रोटीपर्यंत लोकांना तो खूप आवडतो. पण तुम्हाला माहित आहे का की सर्वात मोठी चपाती बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही भारताच्या नावावर आहे. सर्वात मोठ्या चपातीचे वजन सुमारे 145 किलो होते. सर्वात मोठी चपाती खास प्रसंगी बनवली जाते आणि ही एक चपाती शेकडो लोकांचे पोट भरते. चला तर मग जाणून घेऊया जगातील सर्वात मोठी चपाती भारतातील कोणत्या शहरात बनवली जाते.

जगातील सर्वात मोठी चपाती कशी बनवली जाते?

जगातील सर्वात मोठी भाकरी गुजरातमधील जामनगरमध्ये बनवली जाते. ती तयार करण्यासाठी खूप लोक लागतात. भाकरी जळू नये म्हणून मंद आचेवर तयार केली जाते. बनवल्यानंतर शेकडो लोकांमध्ये त्याचे वाटप केले जाते. जेव्हा ही चपाती बनवली जाते, तेव्हा ती पाहण्यासाठी सर्व लोक जमतात.

सर्वात मोठी चपाती कधी बनवली जाते?

जगातील सर्वात मोठी चपाती एका खास प्रसंगी बनवली जाते. जामनगरमधील जलाराम बापा आणि दगडू सेठ गणपती सार्वजनिक उत्सवाच्या जयंतीला जगातील सर्वात मोठी चपाती बनवली जाते. ही चपाती जलाराम मंदिराच्या जीर्णोद्धार समितीकडून बनवली जाते. ही चपाती मंदिरात येणाऱ्या सर्व लोकांना दिली जाते. जामनगरच्या बाहेरूनही अनेक जण ही चपाती पाहण्यासाठी येतात.

खास तवा बनवला…

विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी चपाती बनवण्यासाठी एक नव्हे तर अनेक महिलांना एकत्र यावे लागते. मग तासन् तासांच्या मेहनतीनंतर ही चपाती तयार केली जाते. यासाठी भरपूर गव्हाचे पीठ लागते. जेव्हा ही चपाती तयार होते तेव्हा तिचे वजन सुमारे 145 किलोपर्यंत असते. ही चपाती बनविण्यासाठी मंदिर समितीने खास तवा बनवला आहे. ही चपाती बनवण्यासाठी बरेच लोक लागतात.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.