गुणरत्न सदावर्तेंच्या घरी पाळीव गाढव, सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात सहभागी होणाऱ्या ‘मॅक्स’ची गोष्ट
णरत्न सदावर्ते यांनी घरात गाढव पाळण्याची सोशल चर्चा आहे. त्यांची लेक झेनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केला जातोय. या गाढवाचं नाव मॅक्स, असं आहे. एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय आल्यानंतर या मॅक्सला पेढे भरवल्याचं समोर आलं होतं. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी त्यांच्या फेसबुकला या मॅक्सचे फोटो शेअर केले आहेत.
मुंबई : गुणरत्न सदावर्ते… बस नामही काफी है! सदावर्तेंच्या (Gunratn Sadavarte) नावासमोर सध्या चर्चा आणि व्हायरल हेच शब्द सध्या चपखल बसतात. सध्या सदावर्तेंसंदर्भातला एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गाढव (Donkey) घरात पाळल्याचं तुमच्या ऐकीवात आहे का? नसेल तर तुम्हाला त्याचं ताजं आणि ज्वलंत उदाहरण सांगणार आहोत. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी गाढव पाळण्यात आलं आहे. या गाढवामुळे सदावर्ते पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांची लेक झेनचा या मॅक्स नावाच्या गाढवासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सदावर्तेंनी गाढव पाळलंय?
गुणरत्न सदावर्ते यांनी घरात गाढव पाळण्याची सोशल चर्चा आहे. त्यांची लेक झेनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केला जातोय. या गाढवाचं नाव मॅक्स, असं आहे. हा मॅक्स सदावर्तेंच्या प्रत्येक आनंदात सहभागी होत असतो. एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात निर्णय आल्यानंतर या मॅक्सला पेढे भरवल्याचं समोर आलं होतं. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी त्यांच्या फेसबुकला या मॅक्सचे फोटो शेअर केले आहेत.
गुणरत्न सदावर्तेंच्या लेकीवर गुन्हा दाखल होणार?
गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेनचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती गाडी चालवताना दिसतेय. झेनचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीच्या नियमात ते बसत नाही. याच कारणामुळे तिच्यावर गुन्हा दाखल होणार का? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
सदावर्तेंवर गुन्हा दाखल
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण बीडमध्ये सदावर्ते यांच्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत अपशब्द वापरल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या तक्रारी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सदावर्तेंवर दाखल होणारा हा तिसरा गुन्हा आहे. सुरूवातीला शरद पवारांच्याघराबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. या आंदोलकांना भडकावल्याचा आणि सतत प्रक्षोभक भाषणं केल्याचा, कट रचल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई पोलिसांकडून ठेवण्यात आला. या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्तेंना चार दिवस पोलीस कोठडीत मुक्कामी काढावे लागले, त्यानंतर त्यांचा ताबा हा सातारा पोलिसांना देण्यात आला.
संबंधित बातम्या
Video : पक्ष्यांना ‘याड लागलं’, डोळ्याचं पारणं फेडणारा व्हीडिओ, एकदा बघाच…
Video : पोलिसाने वाचवले माकडाचे प्राण, स्थानिकांकडून कौतुक, व्हीडिओ व्हायरल…
VIDEO: जगात अशक्य असं काहीच नाही! या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पाहा, त्याच्या जिद्दीला कराल सलाम