‘यह तो आशा की लहर है, यह तो उम्मीद की सेहर है’, गुरू रंधावानं शेअर केला चिमुकल्याचा हृदयस्पर्शी Video

Child video : एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मूल (Little boy) रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर खाद्यपदार्थ (Food) बनवत आहे. ज्या पद्धतीने मूल मेहनतीने जेवण बनवत आहे, लोकांची मने तो जिंकत आहे.

'यह तो आशा की लहर है, यह तो उम्मीद की सेहर है', गुरू रंधावानं शेअर केला चिमुकल्याचा हृदयस्पर्शी Video
रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ बनवून विकणारा मेहनती चिमुरडा
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 11:15 AM

Child video : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ पाहताना तुम्हाला विचार करायला भाग पाडतात, तर काही व्हिडिओ असे आहेत जे तुमच्या हृदयाला स्पर्श करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मूल (Little boy) रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर खाद्यपदार्थ (Food) बनवत आहे. ज्या पद्धतीने मूल मेहनतीने जेवण बनवत आहे, लोकांची मने तो जिंकत आहे. प्रसिद्ध गायक गुरू रंधावाने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ 20 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल झालेला हा मुलाचा व्हिडिओ केवळ 12 सेकंदांचा आहे, पण त्याने लोकांची मने जिंकली आहेत.

सोशल मीडिया यूझर्स झाले चाहते

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक मुलगा रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर चायनीज पदार्थ बनवत आहे. मुलाची उंची कमी आहे, म्हणून तो स्टूलवर उभे असताना डिश तयार करत आहे. गायक गुरू रंधावा व्यतिरिक्त सोशल मीडियावरील पब्लिकही त्याची चाहती झाली आहे.

गुरू रंधावाने केले कौतुक

गायक गुरू रंधावाने या मुलाचा व्हिडिओ शेअर करताना इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘भगवान हर उस बच्चे पर अपनी कृपा बनाए रखे, जो अपने परिवार को दो वक्त की रोटी देने के लिए कड़ी मेहनत कर रहा है.’ या व्हिडिओला लाखो लोकांनी लाइक केले आहे. त्याच वेळी, व्हिडिओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक यूझर्सनी हार्ट इमोजीसह त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

यूझर्सना मुलाच्या भविष्याची चिंता

या व्हिडिओला नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. काही लोक मुलाची मेहनत आणि समर्पण पाहून पूर्णपणे प्रभावित झाले आहेत, तर काही यूझर्सनी लिहिले आहे, की असा दिवस अशा लहान मुलांना देवाने दाखवू नये. एका यूझरने कमेंट करताना लिहिले, ‘अरे… इतक्या लहान वयातही काम करावे लागत आहे. देव या मुलाला आशीर्वाद देवो.” आणखी एका यूझरने म्हटले, की या मुलाला माझा सलाम. ज्या वयात मुले खेळतात, त्या वयात हा मुलगा आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत आहे. एकूणच लोकांच्या मनातही मुलाच्या भवितव्याची चिंता आहे.

आणखी वाचा :

मुलांमध्ये कधीही भेदभाव करू नका, आपल्या वागण्यातून काय संदेश देतेय ही चिमुरडी? Video viral

Deer video viral : जीव वाचवण्यासाठी हरिणांनी लढवली अनोखी शक्कल, रिकाम्या पोटी जंगली कुत्र्यांना फिरावं लागलं परत!

Funny video viral : मांजरीचं ‘हे’ पिल्लू किती खट्याळ असावं? पाहा काय केलं?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.