Viral: गुवाहाटीची झाडं झाली ना इकडं व्हायरल! नेते म्हणाले आरा, “ओक्के मध्ये आहे…काय ती झाडी, काय डोंगार…” निस्ती ऑडिओ क्लिपची चर्चा

जो तो उठतोय, निसर्गातला आपला एखादा फोटो टाकतोय आणि त्याला कॅप्शन देतोय,‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’.

Viral: गुवाहाटीची झाडं झाली ना इकडं व्हायरल! नेते म्हणाले आरा, ओक्के मध्ये आहे...काय ती झाडी, काय डोंगार... निस्ती ऑडिओ क्लिपची चर्चा
आरा, "काय झाडी, काय डोंगार...ओक्के मध्ये आहे" Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 9:07 AM

मुंबई: शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार शाहजीबापू पाटील! राजकारण राहिलं बाजूला आणि हे बंडखोर आमदार सध्या तुफान व्हायरल झालेले आहेत. कालपासून फेसबुकवर लोकांचा नुसता राडाच सुरु आहे. जो तो उठतोय, निसर्गातला आपला एखादा फोटो टाकतोय आणि त्याला कॅप्शन देतोय,‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’. आमदार शाहजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी आपल्या गावातल्या एका कार्यकर्त्याला फोन केला. फोनवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्याला सांगितलं गुवाहाटीमध्ये काय बाबा एक नंबर झाडं आहेत, डोंगर आहेत, हॉटेल आहेत. आता हे सांगताना त्यांनी जरा त्यांच्या गावाकडच्या शैलीत सांगितलं त्यामुळे ते वाक्य खूपच व्हायरल झालं. त्याहीपेक्षा राज्यात इतका मोठा राजकीय (Political) भूकंप सुरु असताना राज्याचं काय आणि ह्यांचं काय असं म्हणत ते प्रचंड ट्रोल झाले.

निसर्ग बघून शहाजीबापू भारावले

गुवाहाटीतली निसर्ग बघून शहाजीबापू भारावले. त्यांनी आपल्या मतदारसंघातील एका कार्यकर्त्याला फोन केला आणि मनमोकळा संवाद साधला. त्या संवादातील त्यांचं एक वाक्य आज चर्चेचा विषय ठरतंय. ‘काय झाडी, काय डोंगुर, काय हाटील’ हेच ते वाक्य आहे. ती झाडी, ते डोंगर आणि ते हॉटेलं पाहून शाहजीबापू पाटील एवढे भारावून का गेले? असा सवाल अनेकांना पडलाय.आसाममधील झाडी आणि डोंगर पाहून बापूंना आनंद होण्याची कारणंही तशीच आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे बापुंचा मतदारसंघ, बापू सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्त्व करतात आणि हा मतदारसंघ दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.

हे सुद्धा वाचा

मंत्रिपदाची ऑफर

तसं तर शाहजीबापू पाटील यांची ऑडिओ क्लिपच व्हायरल झालीये. त्यात बऱ्याच गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या, ज्यात त्यांनी नवं सरकार स्थापन झाल्यास मंत्रिपदाची ऑफर असल्याचा त्यांनी उल्लेख केला. नुसत्या गुवाहाटीमधल्या निसर्गाचं कौतुक न करता शाहजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाचं देखील कौतुक केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार सुडानं वागतायत, आपल्याला एकनाथ शिंदेंचं नेतृत्त्व आवडलंय असा उल्लेख त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये केलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.