#Himveers : ITBPच्या ज्युलीचा आपल्या गोंडस पिल्लांसोबतचा ‘हा’ Photo आणि Video होतोय Viral! तुम्ही पाहिला का?
आयटीबीपी (Indo-Tibetan Border Police) यांच्यातर्फे हे फोटो पोस्ट करण्यात आलेत. ITBP श्वान ज्युली (मालिनॉइस) हिनं हरयाणातल्या पंचकुला जवळच्या ITBP, BTC, भानू इथं NTCD इथं नॅशनल ऑगमेंटेशन फॉर K9s (NAK) प्रकल्पात 8 निरोगी पिल्लांना जन्म दिला.
Happy mother dog with cute puppies : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला रोज काहीतरी नवीन पाहायला मिळत असतं. इथं कधी लहान मुलांचे व्हिडिओ, फोटो असतात, तर कधी निसर्गसौंदर्य किंवा मनोरंजनात्मक. प्राण्यांचे व्हिडिओ किंवा फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. कारण ते असं काहीतरी करतात की पाहायला सर्वांनाच आवडतं. प्राण्यांचे विशेषत: त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांचे फोटो किंवा व्हिडिओ खूपच क्यूट असतात. आता असेच क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आयटीबीपी (Indo-Tibetan Border Police) यांच्यातर्फे हे फोटो पोस्ट करण्यात आलेत. ITBP श्वान ज्युली (मालिनॉइस) हिनं हरयाणातल्या पंचकुला जवळच्या ITBP, BTC, भानू इथं NTCD (नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग) इथं नॅशनल ऑगमेंटेशन फॉर K9s (NAK) प्रकल्पात 8 निरोगी पिल्लांना जन्म दिला.
ट्विटरवर शेअर
आयटीबीपीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं, की योद्धा असलेल्या ज्युलीनं आठ लढाऊ पिल्लांना जन्म दिला. ज्युली मॅलिनॉइस जातीची आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) सैन्यातही त्यांचा वापर होतो. आयटीबीपीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यासंबंधीचा व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात एक आयटीबीपी अधिकारी दिसत आहे. तो ज्युलीला काहीतरी खाऊ घालत आहे. त्याचबरोबर तिची जी क्यूट पिल्लं आहेत, तिला तिच्या आईजवळ प्रेमाने दूध पाजत आहे.
यूजर्सकडून प्रेमाचा वर्षाव
ट्विटरवर हा व्हिडिओ आणि फोटो थोड्या वेळापूर्वीच शेअर करण्यात आलाय. #Himveers असा हॅशटॅग देण्यात आला आहे. यूझर्सना हा फोटो आणि व्हिडिओ प्रचंड आवडला असून काही वेळातच याला दोन हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच लाइक आणि कमेंट्स करून लोक ज्युली आणि तिच्या गोड पिल्लांविषयी प्रेम व्यक्त करत आहेत.
ITBP’s K9 Julie is a Mommy- 8 times over!
ITBP’s dog mom Julie (Malinois) gave birth to 8 healthy pups at the National Augmentation for K9s (NAK) Project at the NTCD (National Training Centre for Dogs) at ITBP, BTC, Bhanu near Panchkula, Haryana.#Himveers pic.twitter.com/3AyhyByLO9
— ITBP (@ITBP_official) February 25, 2022