happy new year 2024 Marathi message | नवीन वर्षाचे खास मराठमोळे संदेश पाठवा आपल्या मित्र अन् नातेवाईकांना
happy new year 2024 | सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्यातील नागरिक सज्ज आहे. नवीन वर्षांत नवीन संदेश तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना नक्कीच उर्जा देणार आहे. नवीन वर्षाचे खास मराठमोळे संदेश...
मुंबई, दि. 31 डिसेंबर 2023 | 2023 वर्षाचा आज शेवटचा दिवस. आता 2024 नवीन आशा, अपेक्षा घेऊन येणार आहे. 2024 हे नवीन वर्ष अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. या नवीन वर्षाच्या स्वागतास आता काही तास बाकी आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साह अन् आनंदाचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. या वेळीही तुम्ही नववर्षाच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना मराठीत शुभेच्छा संदेश पाठवू शकतात. मराठीतील खास मराठमोळे शुभेच्छा संदेश…
तुम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे संदेश शोधत असाल, तर तुमच्यासाठी खास मराठीतील शुभेच्छांचे संदेश घेऊन आलो आहोत. तुम्ही हे संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पाठवून तुमच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतात. (Happy New Year 2024)
दु:ख सारी विसरुन जावू
सुख देवाच्या चरणी वाहू
स्वप्न उरलेली नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
………………………….
नव्या कल्पनांचे मनोरे रचुया
नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया
नवे वर्ष आहे नव्याने आलेले
नवे रंग उधळून स्वागत करुया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
…………………..
गेले ते वर्ष, गेला तो काळ
नवीन आशा अपेक्षा घेऊन आले २०२४ साल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
…………………………..
पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
…………………………
नवीन वर्षात नवा संकल्प करुया,
ह्रदयाचा एक छोटासा कप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करुया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
…………………………………..
दुःख सारे विसरून जाऊ ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्न उरलेली या नव्या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
……………………………
सर्वांच्या हृदयात असू दे प्रेमाची भावना
नव्या वर्षात पुरी होऊ दे अपूर्ण अपेक्षा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
………………………………
नवी वर्षात आपल नातं असंच राहू दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू दे
सुंदर असा प्रवास होता 2023 या वर्षाचा
2024 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
……………………………………
नवीन वर्ष प्रकाश बनून आले
या वर्षात तुमच्या भाग्याची ही रेषा उजळणार
परमेश्वराची कृपा राहो नेहमी तुमच्यावर खास
तुमच्या जीवनाचा प्रकाश सूर्यासारखा लखलखू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!