Video : ‘तुम किसी और को चाहोगी तो…’ रशिया-युक्रेन युद्धावर Harsh Goenka यांचं मजेशीर Tweet होतंय Viral

Russia Ukraine war : हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी एक व्हिडिओ (Video) शेअर करून युक्रेनवर रशिया इतका नाराज का आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक 42 सेकंदांची व्हिडिओ क्लिप आहे, जी एका हिंदी चित्रपटातील गाणे आहे.

Video : 'तुम किसी और को चाहोगी तो...' रशिया-युक्रेन युद्धावर Harsh Goenka यांचं मजेशीर Tweet होतंय Viral
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीनImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 4:55 PM

Russia Ukraine war : सोशल मीडियावर सेलिब्रिटी खूप सक्रिय असतात. परंतु भारतात असे काही उद्योगपती आहेत जे त्यांच्या फॉलोअर्सचे मनोरंजक आणि सर्जनशील पोस्ट करण्यासाठी ओळखले जातात. RPG समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका (Harsh Goenka) हे त्यापैकीच एक. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या विनाशकारी युद्धाशी (War) संबंधित त्यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. आपल्या पोस्टमध्ये उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक व्हिडिओ (Video) शेअर करून युक्रेनवर रशिया इतका नाराज का आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊ या उद्योगपती गोएंका यांनी काय शेअर केले आहे, जे लोकांना हसवत आहे. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी 42 सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, जी एका हिंदी चित्रपटातील गाणे आहे. ज्यामध्ये राज कपूर गाताना दिसत आहेत.

रशियाचे दुखणे

राज कपूर या गाण्यात म्हणत आहेत, की ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी..’ हा व्हिडिओ युक्रेन आणि रशियामधील युद्धावर अगदी तंतोतंत बसत आहे. कारण युक्रेनने नाटोचे सदस्य व्हावे, असे रशियाला वाटत नाही. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. चला तर मग हा व्हिडिओ पाहू या.

वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणतात…

युद्धाच्या 14व्या दिवशी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे, की त्यांना नाटोचे सदस्यत्व नको आहे. ते म्हणतात, मला वाटते नाटो अजून युक्रेनला स्वीकारायला तयार नाही. यासोबतच झेलेन्स्की म्हणाले, की युक्रेनला असा देश अजिबात नको आहे, जो गुडघ्यावर पडून काहीतरी मागतो. तसेच असा राष्ट्रपती व्हायला मला आवडणार नाही. आता हा रशियाच्या धमकीचा परिणाम आहे, की आणखी काही हे माहीत नाही, पण उद्योगपती हर्ष गोयंका यांच्या व्हिडिओ पोस्टचा लोक खूप आनंद घेत आहेत.

‘दिल ही तो है’मधील गाणे

उद्योगपती हर्ष गोयनका यांनी शेअर केलेला गाण्याचा व्हिडिओ 1963मध्ये आलेल्या ‘दिल ही तो है’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सीएल रावल आणि पीएल संतोषी यांनी केले आहे, तर बीएल रावल हे त्याचे निर्माते आहेत. यात राज कपूर आणि नूतन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आणखी वाचा :

Video : ‘मैं झुकेगा नहीं’चं आतापर्यंतचं Cute version; लोक म्हणतायत, आईनं पुष्पाला जरा जास्तच पाहिलेलं दिसतंय!

Video : तुला घाबरतो असं वाटलं की काय? पाहा, ‘ताडोबा’तला अस्वलाचा ‘हा’ स्वॅग

PV Sindhu : Badminton खेळाडूच नाही तर उत्तम Dancerही! सोशल मीडियावरचा Trend केला Follow, पाहा Video

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.