Marathi News Trending Have you ever seen a tiger hunt definitely watch this video from chandrapur au128
Video : Chandrapur Tiger Hunting | वाघ शिकार कशी करतो पाहिलंत का? चंद्रपुरातील हा व्हिडीओ नक्कीच पाहा…
वाघ काही रानडुकराला सोडत नाही. त्याला पाणवठ्यावरच दाबतो. अर्धमेला झाल्यानंतर तोंडात पकडून रानडुकराला घेऊन जातो. पाणवठ्याबाहेर जंगलात पुन्हा प्रवेश करतो. हे सार व्हिडीओत चित्रीत झालं. हा व्हिडीओ कुणी काढला माहीत नाही. पण, वाघाचा शिकारीचा थाट कसा असतो, हे पाहायचं असेल तर हा व्हिडीओ नक्कीच पाहा. तुम्हाला प्रत्यक्ष जंगलात गेल्याचा वाघ शिकार कशी करतो, हे पाहण्याचा फिल येईल.
वाघ शिकार कशी करतो पाहिलंत का? Image Credit source: t v 9
चंद्रपूर : वाघ पाहण्यासाठी ताडोबा प्रसिद्ध आहे. वाघ जंगलातील (Jungle) प्राण्यांची शिकार करतो. म्हणूनच त्याचा थाट काही औरच असतो. असाच थाट चंद्रपुरात पाहायला मिळाला. सध्या चंद्रपूरसह राज्यात एक व्हिडीओ व्हायरल झालाय. तो वाघ शिकार कशा करतो, याचा एक उत्तम नमुना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कारवा जंगलात वाघाने केलेल्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झाला. जंगलातील कृत्रिम पाणवठ्यावर (Panavatha) पाण्यात डुंबणार्या रानडुकराची सावध चालीने येत शिकार केली. वाघाच्या शिकारीचा रुबाब या वायरल व्हिडीओतून स्पष्ट झाला. एरवी वाघ येत आहे म्हटल्यावर प्राणी- पक्षांचा आकांत रानडुकराच्या (Pig) नजरेतून सुटल्याने तो मनसोक्त पाण्यात डुंबला होता. सावध गतीने जवळ येत एकाच उडीत रानडुकराची शिकार करत वाघाने रानडुकराला पाणवठ्याबाहेर नेले. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातला वन्यजीव श्रीमंतीचा नमुना दाखवणारा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
जंगलातील सीन आहे. गर्द वृक्षांमधून एक वाघ येत आहे. चालतानाची त्याची लकब जरा वेगळीच आहे. जंगलातून तो पाणवठ्यावर येतो. तिथं पाहतो तर काय आधीच एक डुक्कर बसलेला आहे. उन्हाळा असल्यानं डुकरानं पाण्यातच बस्तान बसविलं आहे. वाघाला तो डुक्कर दिसतो. मग, भूक लागली असल्यानं तो शिकारीचा बेत आखतो. दबक्या पावलांनी रानडुकराकडं जातो. रानडुकराला वाघाच्या येण्याची चाहूल काही लागत नाही. तो मस्त पाणवठ्यात थंडीचा आस्वाद घेत असतो. कारण पाण्यात चिखल असतो. त्या चिखलात रानडुकर म्हशीसारखा लेटलेला दिसतो.
कशी करतो शिकार
दबक्या पावलानं आल्यानंतर वाघ जोरात रानडुकरावर झडप मारतो. या झडपेत तो रानडुकराला आपल्या तोंडात घालतो. थोडा वेळ रानडुकर फडफडतो. वाघाच्या तोंडातून सुटका करण्याचा प्रयत्न करतो. पण, वाघ काही रानडुकराला सोडत नाही. त्याला पाणवठ्यावरच दाबतो. अर्धमेला झाल्यानंतर तोंडात पकडून रानडुकराला घेऊन जातो. पाणवठ्याबाहेर जंगलात पुन्हा प्रवेश करतो. हे सार व्हिडीओत चित्रीत झालं. हा व्हिडीओ कुणी काढला माहीत नाही. पण, वाघाचा शिकारीचा थाट कसा असतो, हे पाहायचं असेल तर हा व्हिडीओ नक्कीच पाहा. तुम्हाला प्रत्यक्ष जंगलात गेल्याचा वाघ शिकार कशी करतो, हे पाहण्याच फिल येईल.