Smoking Bird कधी पाहिलाय का? खूप सुंदर
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा अतिशय सुंदर पक्षी आहे. एक फोटोग्राफर या अनोख्या पक्ष्याचा क्लोज अप शॉट घेत आहे.
निसर्गाचं सौंदर्य इतकं जबरदस्त आहे की ते पाहून सगळेच हैराण होतात. आजकाल एका पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा पक्षी तोंड उघडतो तेव्हा त्याच्या तोंडातून धूर निघताना दिसतो असं दिसून येतं. जाणून घेऊयात काय आहे सत्य.
खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भारतीय रेल्वेचे अधिकारी अनंता रुपनगुडी यांनीही आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर करत लिहिले की, हा पक्षी smoking bird म्हणून प्रसिद्ध आहे.
सौंदर्य म्हणजे काय, त्याला प्रत्यक्षात काय म्हटले जाईल याचा विचार करा. या पोस्टनंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा अतिशय सुंदर पक्षी आहे. एक फोटोग्राफर या अनोख्या पक्ष्याचा क्लोज अप शॉट घेत आहे.
Popularly called the smoking bird – such a beauty! Wonder what it’s actually called! #birds #amazing pic.twitter.com/QUrI9CQqZI
— Ananth Rupanagudi (@Ananth_IRAS) October 12, 2022
व्हिडिओत पांढऱ्या पंखांचा हा पक्षी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. पक्ष्याच्या डोळ्यांपासून घशापर्यंतचा भाग वेगवेगळ्या रंगाचा असतो, जो त्याच्या सौंदर्यात भर घालतोय.
बेलबर्ड असं या पक्ष्याचं नाव आहे. हा प्रामुख्याने ब्राझीलमध्ये आढळतो. गंमत अशी आहे की ह्याला धूम्रपान करणारा पक्षी असेही म्हटले जाते कारण ह्याच्या तोंडातून नैसर्गिकरित्या धूर निघतो .
या व्हिडिओच्या शेवटी पक्ष्याच्या तोंडातून धूर निघताना दिसत आहे, हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.