VIDEO | वाहतूक पोलिसाचा चांगुलपणा; रस्त्याशेजारील मुलांना दिले स्वत:च्या डब्यातील जेवण
टिचभर पोटासाठी लोकांपुढे मुले हात पसरताहेत, मात्र कुणाच्या मनाला पाझर फुटलेला नाही. हे पाहून पोलिसातील माणूस हळहळतो व लगेच त्या पोलिसाने स्वत:च्या बॅगेतील डबा आणला व त्या मुलांना जेवायला दिले. (The goodness of the traffic police; Meals in his own box given to street children)
हैद्राबाद : पोलिस हे कायद्याचे रक्षक. रस्त्यारस्त्यावर भर उन्हात उभे राहून कर्तव्य बजावण्याची धमक वाहतूक पोलिसांमध्ये असते. मधेच कधी कामाच्या ताणातून चीडचीडही होते. पण हाच खाकी वर्दीतील पोलिसही एक माणूस असतो हे अनेकांच्या लक्षात येत नाही. अचानक कुठल्या ना कुठल्या प्रसंगात याच खाकी वर्दीतील माणसाचे समाजाला दर्शन होते, त्यावेळी मग पोलिसाच्या खाकी वर्दीवर कौतुकाची थाप पडते. असाच खाकी वर्दीतील कौतुकास्पद विषय असलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे हैदराबादेतील. पण व्हिडीओतील पोलिसाच्या दानशूरपणावर, दिलदार वृत्तीवर संपूर्ण देशभरातून कौतुकाची थाप पडत आहे. लोक भरभरून लाईक्स करीत असून कमेंट्सचाही पाऊस पडत आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहाल, त्यावेळी मोठ्या मनाच्या वाहतूक पोलिसाला नक्कीच दाद द्याल. (The goodness of the traffic police; Meals in his own box given to street children)
व्हिडीओतील किस्सा असा आहे की, कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला रस्त्याशेजारी दोन निष्पाप मुल दिसली. ती मुले पोटाची खळगी भागवण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यापुढे हात पसरताना दिसतात. टिचभर पोटासाठी लोकांपुढे मुले हात पसरताहेत, मात्र कुणाच्या मनाला पाझर फुटलेला नाही. हे पाहून पोलिसातील माणूस हळहळतो व लगेच त्या पोलिसाने स्वत:च्या बॅगेतील डबा आणला व त्या मुलांना जेवायला दिले. वाहतूक पोलिसाची ही दानशूर वृत्ती पाहून तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कौतुक केले नसेल तर नवल. हा व्हिडिओ इंटरनेटवरून वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. त्यामुळे संबंधित पोलिसाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खूप कौतुक झाले. इतकेच नव्हे तर सोमवारी तेलंगणा पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. तेलंगणातील स्थानिक लोक पोलिस हवालदाराची खूप प्रशंसा करत आहेत.
अशा आदर्शवत कृतींमुळे समाजात मोठा बदल होऊ शकतो!
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे ‘भुकेल्या मुलांना दुपारचे जेवण देणाऱ्या वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल महेशने हैद्राबादमध्ये ड्युटीवर असताना या मुलांना पाहिले. त्यांचा चांगुलपणाचा हा अगदी लहानसा प्रयत्नही समाजात मोठा बदल घडवू शकतो. आशा आहे की या मुलांना सुरक्षित निवारा मिळाला असेल. ‘
मुले इतरांकडे जेवण मागत होती
खरंतरं तेलंगणा पोलिसांनी हा व्हिडीओ 17 मे रोजी व्हिडिओ ट्विट केला होता. हा व्हिडीओ अवघ्या दोन दिवसांत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 15,000 हून अधिक लोकांनी लाईक्सच्या माध्यमातून दाद दिली आहे. सुमारे दीड मिनिटांच्या या क्लिपमध्ये आपण पाहू शकता की पोलिस कॉन्स्टेबल प्रथम मुलांना प्लेट्स देतात आणि नंतर पिशवीमधून जेवणाचे डबे बाहेर काढून त्यांना जेवणाची सेवा देतात. दोन्ही मुले मोठ्या उत्साहाने जेवताना दिसतात. वाहतूक पोलिसाची ही छोटीशी दिलदार वृत्ती समाजात नक्कीच मोठासा बदल घडवेल, यात शंका नाही. (The goodness of the traffic police; Meals in his own box given to street children)
Sharing his lunch box with hungry kids is Traffic Police Constable Mr.Mahesh who noticed these kids while on duty in Hyderabad. Wow ♥️ A little act of kindness can make a big difference. Hope these kids have been given a safe refuge. Video by @TelanganaCOPs #KindnessMatters pic.twitter.com/OjUHuTv8ml
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) May 19, 2021
इतर बातम्या
आता Ration Card शिवायही धान्य मोफत मिळणार, सरकारकडून मोठा दिलासा, जाणून घ्या…
मुलं आपली, जबाबदारी सर्वांची, कोरोनानं छत्र हरपलेल्या मुलांच्या मदतीसाठी ‘इथे’ करा संपर्क