लग्न मंडप बनला कुस्तीचे मैदान, व्हऱ्हाडी मंडळी एकमेकांच्या उरावर बसली,असं काय घडलं?

या घटनेची चौकशी केली जात आहे. दोन्ही पक्षांना समोरासमोर बोलावले आहे. परंतू ते समझौता करण्यास तयार नाहीत. आता जो कोणी तक्रार नोंदवेल त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे डीसीपी साऊथ झोन केशव कुमार यांनी सांगितले.

लग्न मंडप बनला कुस्तीचे मैदान, व्हऱ्हाडी मंडळी एकमेकांच्या उरावर बसली,असं काय घडलं?
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 4:49 PM

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. अनेक जणांचे विवाह होत आहेत. परंतू एका विवाह मंडपात वर पक्ष आणि वधू पक्षातील व्हऱ्हाडी मंडळीत तुफान हाणामारी झाली आहे.या हाणामारीत महिलांना देखील पुढाकार घेतला आणि त्या एकमेकांच्या झिंज्या खेचू लागल्या. हा गोंधळ पाहून वधू-वराचे ताळतंत्र बिघडले. वराने तर स्टेज वरुन उडी मारत हा हाणामारीत सक्रीय सहभाग घेतला.या भांडणाला नेमके कारण काय हे नंतर उघडकीस आले.

लखनऊ येथील मोहनलालगंज येथील लग्न समारंभात हे रणकंदन झाले आहे.मोहनलालगंज निवासी शेतकरी सुखलाल यांची मुलगी आरती हीचे लग्न उन्नाव जिल्ह्यात राहणाऱ्या कमलेश यांच्याशी ठरले होते. लग्नाची वाजत गाजत वरात आल्यानंतर मुख्य अक्षता कधी पडतात याची वाट पाहात दोन्हीकडची मंडळी होती. परंतू वराकडील मंडळी जेथे उतरली होती. तेथील काही मंडळी मद्याच्या नशेत होती. त्यांनी नाश्त्यावरुन वधू पक्षाच्या मंडळीवर आग पाखड केली. हे निमित्त ठरले आणि त्यातून शब्दाला शब्द वाढत गेला. हा प्रकार अखेर घरातील बुजुर्ग मंडळींनी चर्चा करुन अखेर शांत केला. आणि कार्यक्रम सुरु झाला.परंतू जेव्हा लग्नाचा मुख्यविधी सुरु झाला तेव्हा स्टेजवर पोहचलेल्या दोन्ही पुन्हा वादावादी सुरु झाली. त्यानंतर शाब्दीक संघर्ष लाथा बुक्क्यांवर आला.

महिलांनी देखील हाणामारी केली

मुलीकडील मंडळींना जेव्हा पाहीले की वधू पक्षाची मंडळी मार खात आहेत,तेव्हा ते भडकले आणि वरापक्षाकडील मंडळींना चोपू लागले.थोड्याच वेळा लग्नाचा मंडप युद्धाचे मैदान झाले. या दरम्यान, वराने गळ्यातील हार तोडून फेकत स्टेजवरुन उडी मारीत मारामारीत सहभाग घेतला. वधू या धक्क्याने स्टेजच्या खाली कोसळली.

हे सुद्धा वाचा

स्टेजच्या खाली पुरुषांच्या बरोबरीला महिला देखील या मारामारीत सहभागी झाली. महीला एकमेकींचे केस ओढुन मारामारी करु लागल्या. त्यानंतर समारंभातील प्लास्टिकच्या खुर्च्या एकमेकांना फेकून मारण्यास सुरुवात झाली. दोन्ही पक्षांना समजविण्याचा प्रयत्न सुरु झाला. परंतू कोणीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या दरम्यान वराच्या भावाच्या गाडीची काच देखील कोणीतरी फोडली.

दारु की हुंडा ?

वर पक्षाकडील काही मंडळी दारुच्या नशेत असल्याने हे भांडण सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही पक्षांतील मंडळीनी यात सहभाग घेतला.मुलीकडच्या मंडळींच्या मते लग्न ठरल्यानंतर अचानक वराने कारची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्याने अखेर दोन लाखाची बाईकची मागणी मान्य करण्यात आली. फ्रिजपासून टीव्हीपर्यंत सर्व देण्यात आले होते. परंतू मागण्यावरुन धुसफूस सुरुच होती.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.