Video | इकडे पतीने पत्नीला मिठीत घेतलं, तिकडे कुत्रा रुसला, पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील पती-पत्नी एकमेकांना मिठीमध्ये घेत असताना त्यांनी पाळलेला कुत्रा मात्र चांगलाच नाराज झाला आहे. मलाही मिठीत घ्या म्हणत हा कुत्रा व्हिडीओतील नवरा-बायकोंना त्रास देतोय.

Video | इकडे पतीने पत्नीला मिठीत घेतलं, तिकडे कुत्रा रुसला, पाहा व्हायरल व्हिडीओ
HUSBAND WIFE DOG VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 9:10 PM

मुंबई : जेव्हा आपल्या आवडीची व्यक्ती आपल्याला मिठीत घेते तो क्षण अतिशय नाजूक आणि आनंददायी असतो. पती-पत्नीने एकमेकांना मारलेली मिठी तर यामध्ये अगदीच खास असते. यावेळी एकमेकांना मिठीत घेताना कोणी त्रास दिला तर मोठी चिडचिड होते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील पती-पत्नी एकमेकांना मिठीमध्ये घेत असताना त्यांनी पाळलेला कुत्रा मात्र चांगलाच नाराज झाला आहे. मलाही मिठीत घ्या म्हणत हा कुत्रा व्हिडीओतील नवरा-बायकोंना त्रास देतोय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Husband Wife hugging each other dog have trouble video went viral on social media)

कुत्रा म्हणतो मलाही जवळ घ्या

व्हिडीओमध्ये नवरा-बायको एकमेकांना मिठीत घेत आहेत. यावेळी त्यांनी पाळलेला टकर नावाचा कुत्रा त्यांच्या मध्ये-मध्ये करतो आहे. जेव्हा नवरा-बायको एकमेकांच्या मिठीत येतात, त्याच वेळी हा कुत्रा दोघांवरही भुंकतो आहे. तो जोरात भुंकत असून मलासुद्धा जवळ घ्या असे सांगतो आहे.

हात समोर करताच कुत्रा दोघांकडे धावला

व्हिडीओतील जोडी एकमेकांना मिठीत घेताना हा कुत्रा त्यांच्या मध्ये-मध्ये करतोय. शेवटी व्हिडीओतील महिला जेव्हा कुत्र्याशी बोलणे सुरु करते, तेव्हा तो थोडा शांत होताना दिसतोय. व्हिडीओतील महिलेने तुलासुद्धा जवळ घ्यायचं का ? असे विचारले आहे. तसेच महिलेने समोर हात केल्यानंतर हा कुत्रा दोघांकडेही धावला आहे. महिलेने इशारा करताच कुत्र्याने त्यांच्याकडे झेप घेतली आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. लोक कुत्र्याच्या हुशारीने प्रभावित झाले असून या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | पत्नी चहा द्यायला आली अन् भलतंच घडलं, पतीही चांगलाच संतापला, पाहा मजेदार व्हिडीओ

Video | प्रसिद्धी मिळवण्याची तरुणाला भारीच हौस, समोरुन दुचाकी येताच थेट तलावात पडला, पाहा व्हिडीओ

Video | घनदाट जंगलात लपून बसला, संधी मिळताच हरणावर झेप, पाहा वाघाने केलेल्या शिकारीचा थरारक व्हिडीओ

(Husband Wife hugging each other dog have trouble video went viral on social media)

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.