Hydroman Video | कहर! पाण्याखाली दांडिया, खात्री करून घ्यायला व्हिडीओ पुन्हा-पुन्हा बघाल
सध्याचं "रील कल्चर" हे अगदी घराघरांत पोहचलंय असं म्हणायला हरकत नाही. हे कल्चर मर्यादित पण तितकंच आहे. म्हणजे जो सीझन असेल त्यानुसार रिल्स टाकले जातात आणि मग ते तितकेच वेगाने व्हायरल होतात. आता हाच व्हिडीओ बघा, या व्हिडीओ मध्ये एका मुलाने गरबा केलाय तो व्हायरल झालाय.
मुंबई: सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी यावर डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी यावर गाण्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी लहान मुलांचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्याचं “रील कल्चर” हे अगदी घराघरांत पोहचलंय असं म्हणायला हरकत नाही. हे कल्चर मर्यादित पण तितकंच आहे. म्हणजे जो सीझन असेल त्यानुसार रिल्स टाकले जातात आणि मग ते तितकेच वेगाने व्हायरल होतात. आता हाच व्हिडीओ बघा, या व्हिडीओ मध्ये एका मुलाने गरबा केलाय तो व्हायरल झालाय. आता तुम्ही म्हणाल गरबाच केलाय ना त्यात काय विशेष? पण हा गरबा जरा हटके आहे.
तुम्हाला हायड्रोमॅन माहितेय का?
इंस्टाग्रामवर असणारा हा हायड्रोमॅन पाण्याखाली डान्स करतो. तो फक्त डान्स नाही कधी कधी तर तो फूटबॉल, बास्केटबॉल सुद्धा करतो. पाण्याखाली तो सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो म्हणून त्याला हायड्रोमॅन म्हणतात. या व्यक्तीने पाण्याखाली अक्षरशः स्कुटर सुद्धा चालवलीये, त्याने स्नूकर खेळलाय. जयदीप गोहिल असं याचं नाव आहे. हा साधासुधा डान्सर नाही, अंडरवॉटर डान्सर आहे. जिथे पाण्याखाली माणसाला श्वाससुद्धा घ्यायला अडचण येते तिथे हा माणूस डान्स करतो. जयदीप गोहिलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असे अनेक धक्कादायक व्हिडीओ आहेत.
View this post on Instagram
गजब आहे हे, हो ना?
व्हिडीओ बघा, यात निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला जयदीप गोहिल तुम्हाला दिसेल. त्याच्या हातात दांडिया आहेत. पाण्याखाली त्याने जणू काही एखादा सेट बनवलाय. आपण दांडिया-गरबा खेळायला गेल्यावर तिथे ज्या प्रकारे सगळं सजवलेलं असतं त्याप्रकारे या हायड्रोमॅनने पाण्याखाली सगळं सजवलेलं आहे. मागे ढोल लावलेत, रंगीबेरंगी पताका सोडल्यात. गरब्याचा-दांडियाचा माहोल बनवून हा हायड्रोमॅन आयुषमान खुराणाच्या राधे-राधे या गाण्यावर दांडिया खेळतोय. तो हे सगळं पाण्याखाली करतोय बरं का…कधी उभा राहून, तर कधी खाली आडवा होऊन तो दांडियाच्या स्टेप्स करतोय. गजब आहे हे, हो ना?