Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ना मोबाईलचं वेड, ना सेल्फी आवड, अशी ‘गॅझेट फ्री’ आई लाभलेली आपली शेवटची भाग्यवान पिढी”, आयएएस अधिकाऱ्याचं पत्र व्हायरल

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांचं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलंय. या पत्रात त्यांनी अश्या पिढीचा उल्लेख केलाय ज्यांची आई गॅझेटच्या दुनियापासून कोसो दूर आहे.

ना मोबाईलचं वेड, ना सेल्फी आवड, अशी 'गॅझेट फ्री' आई लाभलेली आपली शेवटची भाग्यवान पिढी, आयएएस अधिकाऱ्याचं पत्र व्हायरल
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 5:15 PM

मुंबई : आईसाठी आपल्या प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. त्याबद्दल अनेकजण उघडपणे आपल्या भावना व्यक्त करतात. तर काहीजण तो हळवा कोपरा कायम आपल्या मनात जपतात. असंच आईविषयी बोलणारं एक पत्र सध्या व्हायरल होतंय. हे पत्र आहे, आयएएस अधिकारी अर्पित वर्मा (IAS Arpit Verma) यांचं. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय (Viral Latter) बनलंय. या पत्रात त्यांनी अश्या पिढीचा उल्लेख केलाय ज्यांची आई गॅझेटच्या दुनियापासून कोसो दूर आहे. त्यांनी लिहिलंय की ज्यांची आई मोबाईल वापरत नाही, अश्या शेवटच्या पिढीचे आपण सदस्य आहोत. आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला अशी ‘गॅझेट फ्री’ आई (Gadget free Mother) मिळाली आहे.

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांचं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलंय. या पत्रात त्यांनी अश्या पिढीचा उल्लेख केलाय ज्यांची आई गॅझेटच्या दुनियापासून कोसो दूर आहे. त्यांनी लिहिलंय की ज्यांची आई मोबाईल वापरत नाही, अश्या शेवटच्या पिढीचे आपण सदस्य आहोत. आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला अशी ‘गॅझेट फ्री’ आई मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आईबद्दल हृदयस्पर्शी ओळी लिहिल्या आहेत. या पत्रावर लिहिलं आहे की, “आमची ही शेवटची पिढी आहे, ज्याच्याकडे अशी मायाळू आई आहे. ना तिचं कोणत्या सोशल मीडियावर अकाऊंट आहे, ना तिला सेल्फी घेण्याची आवड आहे. तिला तर हे देखील नाही माहित की स्मार्टफोनचं लॉक कसं उघडलं जातं. तिला तिची जन्मतारीखही नाही माहित. जिने खूप कमी सुखसुविधांमध्या आपलं जीवन जगलं आहे, तेही कुठलीही तक्रार न करता. होय मी त्या पिढीचा सदस्य आहे, ज्यांच्याकडे अशी आई आहे.”, या पत्राची आणि या मजकुराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

अर्पित यांच्या या ट्विटला साडे आठ हजार लोकांनी लाईक केलंय. तर एक हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलंय.

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.