Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo

Food wasted in wedding : लग्नादरम्यान अन्नाची सर्वाधिक नासाडी होते. सध्या एक फोटो (Photo) व्हायरल (Viral) होत आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) 2021मध्ये भारत 116 देशांच्या यादीत 101व्या क्रमांकावर असताना ही परिस्थिती आहे.

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo
विवाहादरम्यान वाया गेलेलं अन्न
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 11:06 AM

Food wasted in wedding : भारतात लग्नात पाण्यासारखा पैसा वाया जातो! सजावटीपासून ते खाद्यपदार्थ आणि वधू-वरांचे कपडे सर्वच खास असते. यामुळेच आपल्या देशात लग्नादरम्यान लाखो रुपये फक्त खाण्यावरच खर्च होतात. अशा परिस्थितीत सर्वाधिक अन्नाची नासाडी केवळ विवाहांमध्येच दिसून येते. अनेकवेळा लग्नसमारंभात असे दिसून येते, की लोक भरलेले संपूर्ण ताटही कचराकुंडीत टाकतात. ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) 2021मध्ये भारत 116 देशांच्या यादीत 101व्या क्रमांकावर असताना ही परिस्थिती आहे. अशा स्थितीत लग्न आणि पार्ट्यांमध्ये अन्नाची नासाडी करणे हे उपरोधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून एक फोटो (Photo) व्हायरल (Viral) होत आहे. जो खरोखरच चिंताजनक आहे. अन्नाचा कधीही अपमान होता कामा नये आणि अन्नाची नासाडी करू नये, हे लहानपणी आपण सगळेच ऐकत मोठे होतो, पण लग्नात किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात आपण लहानपणाचा हा धडा विसरतो.

फोटो व्हायरल

याचसंदर्भात आता एक फोटो व्हायरल होत आहे. हा पुरावा म्हणजे हा व्हायरल फोटो, ज्यामध्ये एक व्यक्ती उरलेल्यया अन्नाच्या प्लेट्स तसेच लग्नात टाकलेले वाया गेलेले अन्न साफ ​​करताना दिसत आहे. तसे पाहिले तर हे अन्न अनेक भुकेल्यांचे पोट सहज भरू शकते.

ट्विटरवर शेअर

व्हायरल होत असलेला हा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले, ‘तुम्ही तुमच्या लग्नाच्या फोटोग्राफरकडून मिस केलेला फोटो. अन्न वाया घालवणे बंद करा.” हे चित्र पाहिल्यानंतर लोक प्रचंड संतापलेले दिसत आहेत आणि कमेंट्समधून त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

‘गरजूंना दिले पाहिजे’

एका यूझरने लिहिले, की असे नियम केले पाहिजेत जेणेकरून अन्नाची अशी नासाडी टाळता येईल. आणखी एकाने लिहिले, ‘लग्नात उरलेलं अन्न गरजूंना वाटले पाहिजे.’ याशिवाय इतरही अनेक यूझर्सनी यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा :

Video viral : ‘याच्या’ हौसेला मोलच नाही! 1-1 रुपया जमवत अखेर खरेदी केली आपल्या स्वप्नातली स्कूटर

‘कोरोनानं लावलं जगाला वेड, त्याची सर्वांना लागण.. या सुरक्षेनं लावला वेळ, झालंबाबा एकदाचं लगन’, यासह ऐका भन्नाट Ukhane

Viral Video : …म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.