AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | सुनेचा फोटो चांगला निघावा यासाठी म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांनी चांगल्या पोझसाठी केली मदत, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

VIDEO | सासरा काढतोय मोबाईलमध्ये सुनेचा फोटो, सासूने पकडली ओढणी. एक समुद्र किनाऱ्यावरील हा दुर्मिळ क्षण एकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

VIDEO | सुनेचा फोटो चांगला निघावा यासाठी म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांनी चांगल्या पोझसाठी केली मदत, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...
viral instagram videoImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 24, 2023 | 7:59 AM
Share

मुंबई : सकाळी-सकाळी प्रत्येकाला हसायला आवडतं. किंवा दिवसभर मूड फ्रेश (Mood fresh) ठेवण्यासाठी अनेकजण सकाळी चांगल्या गोष्टी पाहतात, नाहीतर ऐकतात. अशीचं एक हास्यास्पद गोष्ट तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. त्यामध्ये आपल्या सुनेचा फोटो चांगला यावा यासाठी सासू-सासरे काय करीत आहेत हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताचं व्हायरल झाला आहे. त्यावर आतापर्यंत अनेक कमेंट देखील आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी कमेंट करुन सासू-सासऱ्याला कमेंट केली आहे.

व्हायरल झालेल्या तो व्हिडीओ अभिनेता भूषण प्रधान यांनी त्यांच्या इंन्स्टाग्रामवरती सुद्धा शेअर केला आहे. एका छोट्या व्हिडीओमध्ये एका समुद्राच्या किनारी एक कुटुंब गेलं आहे. तिथं ते आपल्या मुलाला आणि सुनेला फोटो काढण्यासाठी मदत करीत आहेत. त्यावेळी सासूने सुनेची ओढणी हातात पकडली आहे. तर सासरे वेगवेगळ्या अँगलने फोटो शुट करीत आहेत. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ अनेकांना आवडला सुध्दा आहे.

शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की “या सासू-सासऱ्यांना त्यांच्या सुनेला समुद्रकिनाऱ्यावर छान फोटो काढायला मदत करताना पाहून भारावून गेलो!”

आतापर्यंत हा व्हिडीओ ९ लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर इंन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना त्याचं हसू रोकता येत नसल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे. काही लोकांनी या घटनेला दुर्मिळ क्षण असं म्हटलं आहे. आतापर्यंत हजारोच्या संख्येने कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.