भारतातून चित्ता नामशेष का झाला? आयएफएस अधिकाऱ्याची पोस्ट, लोकं आश्चर्यचकित
चित्त्याच्या स्वागताच्या पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्या. त्याचबरोबर आणखी एक पोस्ट सातत्याने व्हायरल होतीये. या पोस्ट मध्ये चित्ता भारतातून नामशेष व्हायची कारणं काय आहेत हे सांगितलं गेलंय, आयएफएस ऑफिसर परवीन कासवान यांनी सुद्धा त्यांचं मत मांडलेलं आहे.
नामशेष झालेल्या चित्त्याचं (Cheetah) काल, 17 सप्टेंबरला भारतात स्वागत करण्यात आलं. चित्ता भारतात आला. मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात ८ चित्ते आयात करण्यात आले. पंतप्रधानांच्या वाढदिवसावेळी नामिबियातून हे चित्ते ग्वाल्हेर विमानतळवर आणले गेले. आता त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात काही दिवस निदर्शनात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना जंगलात ठेवण्यात येईल. चित्त्याच्या स्वागताच्या पोस्ट प्रचंड व्हायरल (Viral Post) झाल्या. त्याचबरोबर आणखी एक पोस्ट सातत्याने व्हायरल होतीये. या पोस्ट मध्ये चित्ता भारतातून नामशेष व्हायची कारणं काय आहेत हे सांगितलं गेलंय, आयएफएस ऑफिसर (IFS Officer) परवीन कासवान यांनी सुद्धा त्यांचं मत मांडलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात चित्त्याला कशी वागणूक दिली जायची ते त्यांनी या पोस्ट मध्ये सांगितलंय. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झालीये.
When #Cheetah are coming back to #India. A look at how the last of the lots were hunted, maimed and domesticated for hunting parties. Video made in 1939. 1/n pic.twitter.com/obUbuZoNv5
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 16, 2022
आयएफएस अधिकाऱ्याने एक व्हिडिओ सामायिक केला आहे ज्यामध्ये चित्त्याला कशी वागणूक दिली जात होती ते सांगितलंय. पाळीव प्राण्यासारखं चित्त्याला ठेवलं जायचं. बरेचदा त्यांचा शिकारीसाठी वापर केला जायचा. त्याला “शिकारी बिबट्या” म्हणून संबोधलं जायचं.
Historical record suggests cheetah were in least conflict with humans. Rather they were domesticated and used by hunting parties widely. Even some used to call them ‘hunting leopards’. 2/n pic.twitter.com/YHKpHFFHpY
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 16, 2022
याव्यतिरिक्त, कासवान यांनी काही जुने फोटो आणि रेखाचित्रे पोस्ट केली आहेत. कुत्र्यांसोबत चित्त्यांना बेड्या ठोकल्या जात असल्याचे दिसून येतंय. पूर्वीच्या काळी चित्त्यांना शिकारीसाठी कसे नियुक्त केले जात होते हे इतर काही चित्रांमध्ये दाखविण्यात आलंय.
A painting from 1878 from Marriane North’s book. See how cheetah and lynxes are chained like domestic dogs. Scene is from Alwar or Rajasthan. pic.twitter.com/2131db3wCx
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 17, 2022
1947 मध्ये कोरियाच्या राजाने तीन चित्त्यांच्या कसा मागोवा घेतला याचेही त्यांनी वर्णन केले. कासवान यांनी पोस्ट केलेल्या प्रतिमेत राजा चित्त्याच्या मृतदेहाच्या शेजारी उभा असलेला दिसत आहे.
Another hunting cheetah in India from Prince of Wales visit in 1921-22. These #cheetah were used to catch antelopes. These pics are testimonials that if we don’t pay attention to conservation what remains only is picture. Once found in #India now they are extinct. pic.twitter.com/iCq89yMwym
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 17, 2022