Salary Was Mistakenly Credited: 286 महिन्यांचा पगार एकाच वेळी बँक अकाऊंटमध्ये क्रेडीट झाला; पैशांचा आकडा पाहून भाऊचे डोळे फिरले, डायरेक्ट राजीनामा दिला अन्…

मीडिया रिपोर्टनुसार या कर्मचार्‍यांचा पगार 5 लाख पेसो म्हणजे सुमारे 43 हजार रुपये इतका होता. कंपनीने मे महिन्यात त्याच्या खात्यात 16.54 कोटी पेसो म्हणजेच सुमारे 1.42 कोटी रुपये चुकून ट्रान्सफर केले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने रेकॉर्ड तपासले असता ही चूक लक्षात आली. यानंतर कंपनीने त्याला रक्कम परत खात्यात पाठवण्यास सांगीतले. या व्यक्तीने देखील तसे मान्य केले.

Salary Was Mistakenly Credited: 286 महिन्यांचा पगार एकाच वेळी बँक अकाऊंटमध्ये क्रेडीट झाला; पैशांचा आकडा पाहून भाऊचे डोळे फिरले, डायरेक्ट राजीनामा दिला अन्...
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 5:35 PM

दिल्ली : Your Salary Has Been Credited to Your Account. महिनाभर काम केल्यानंतर सर्वच नोकरदार या मेसेजची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, एका व्यक्तीच्या बँक अकाऊंटमध्ये एकाच वेळी 286 महिन्यांचा पगार जमा झाला आहे. मोबाईलवर त्याला सॅलेरी क्रेडिट झाल्याचा मेसेज आला. ही रक्कम तब्बल 1.42 कोटी रुपये इतकी आहे. या मेसेज नंतर या कर्माचाऱ्याने कंपीनीतून राजीनामा दिला आहे.  हा प्रकार चीलीतील(Chile) Consorcio Industrial de Alimentos (CIAL) या कंपनीत घडला आहे. ही अजब – गजब घटना सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

चिलीतील एका कंपनीकडून ही चुक झाली आहे. या कंपनीने 286 महिन्यांचा पगार आपल्या एका कर्मचाऱ्याच्या खात्यात एकाच वेळी पाठवला. चुक लक्षात येताच कंपनीने कर्मचार्याशी संपर्क साधला. यावेळी त्याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, पण नंतर तो आपल्या वकिलासोबत आला आणि कंपनीतून राजीनामा दिला. हा प्रकार Consorcio Industrial de Alimentos (CIAL) या कंपनीत घडला आहे. ही चिलीमधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

43 हजारांऐवजी 1.42 कोटी रुपये मिळाले

मीडिया रिपोर्टनुसार या कर्मचार्‍यांचा पगार 5 लाख पेसो म्हणजे सुमारे 43 हजार रुपये इतका होता. कंपनीने मे महिन्यात त्याच्या खात्यात 16.54 कोटी पेसो म्हणजेच सुमारे 1.42 कोटी रुपये चुकून ट्रान्सफर केले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने रेकॉर्ड तपासले असता ही चूक लक्षात आली. यानंतर कंपनीने त्याला रक्कम परत खात्यात पाठवण्यास सांगीतले. या व्यक्तीने देखील तसे मान्य केले.

आता कंपनी कायदेशीर कारवाई करणार आहे

यानंतर कंपनीने त्याच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. तसेच बँकेकडून ‘रिफंड’ असा कोणताही मेसेज किंवा माहितीही आली नाही. यामुळे 2 जून रोजी हा कर्मचारी आपल्या वकिलासोबत कंपनीत हजर झाला आणि त्याने मॅनेजमेंटकडे आपला राजीनामा दिला. यानंतर हा व्यक्ती नॉटरिचेबल झाल्याचे समजते. अकाऊंटमध्ये क्रेडिट केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी कंपनी आता या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे समजते.

असंही कारण असत का राजीनाम्याचं; कारण ऐकून लोक म्हणाले, याला म्हणतात, सीधी बात नो बकवास

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने आपल्या कंपनीला राजीनामा पत्र दिले आहे. कारण त्याला काम करण्यात अजिबात मजा येत नाही. त्या व्यक्तीचे हे राजीनामा पत्र इंटरनेटच्या जगात खुपच प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे हा राजीनामा लोकांना खूप आवडला आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.