VIRAL NEWS : एका सेंकदात बॉसने १० दिवस सुट्टी दिली, नेटकरी म्हणाले ‘कुठल्या देवाला नवसं केला होता’
अनेकजण आपल्या बॉसकडे सुट्टी मागायला बऱ्याचदा घाबरतात. कारण बॉस मोठी सुट्टी शक्यतो देत नाही. सध्या सोशल मीडियावर एका गोष्टीची मोठी चर्चा सुरु आहे.
मुंबई : आपल्या कार्यालयातून आपण सुट्टी (leave) घेणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. जेव्हा तुमच्या कामाचा ताण वाढला जातो, तेव्हा तुम्हाला ब्रेक (leave viral news) घ्यावा लागतो. तुम्ही ज्यावेळी सुट्टीची तुमच्या बॉसकडे करता, त्यावेळी ते कामाचा पाडा तुमच्यासमोर वाचून दाखवतात. सुट्टी कमी करावी हे ते तुमच्या लक्षात आणून देतात. अनेकांनी मोठी सुट्टी मागितल्यानंतर बॉस (trending news) त्यांच्या कामातील चुका दाखवतात आणि सुट्टी देत नाहीत.
खरं सांगायचं झालं तर, समुद्रातून एखादी गोष्ट काढणं सोप्पं आहे, परंतु बॉसकडून सुट्टी घेण अवघड आहे असं काहीजण म्हणतात. परंतु आपल्या आजूबाजूची काही लोकं अशी असतात की, त्यांना आरामात सुट्टी मिळते. असाचं एक तरुणीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. त्या तरुणीने तिच्या बॉसकडे तब्बल दहा दिवसांची सुट्टी मागितली. दोन मिनिटात तिच्या बॉसने त्याला मान्यता दिली आहे. त्या कर्मचाऱ्याची खूशी पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या गोष्टीचा स्क्रीनशॉट ट्विटरवरती व्हायरल झाला आहे. लोकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हॉट्सअप्प चॅटची सगळीकडं चर्चा आहे. त्यामध्ये एका कर्मचाऱ्याने त्यांच्या बॉसला विचारलं आहे की, मी या महिन्याच्या १५ तारखेच्या आसपास एक ट्रिपचं नियोजन करीत आहे. मला १५ ते २५ या तारखेला सुट्टी मिळू शकते का ? दोन मिनिटात त्यांच्या बॉसने हा असं उत्तर दिलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी मेसेज सुद्धा डिलीट केले आहेत.
My manager approved my 10 day leave within 2 minutes pic.twitter.com/TkrLknK5rA
— Akansha Dugad (@AkanshaDugad) September 13, 2023
इतक्या लवकर सुट्टीला मंजूरी मिळाल्यामुळे नेटकरी सुध्दा हैराण झाले आहेत. त्याचबरोबर इतक्या लवकर बॉसने सुट्टी दिल्यामुळे संशय व्यक्त केला आहे. काही लोकांनी कमेंटमध्ये कोणत्या देवाला नवसं केलं होतं असं म्हणाले आहेत.